डॉ श्रीकांत शिंदे इकडेही लक्ष द्या, शहाड रेल्वे स्टेशन वर तिकिट घरापासून तीनशे ते चारशेमीटर अंतरावर लावले बँरेकेट,दिव्यांगाची गैरसोय, नैसर्गिक आपत्तीत काय?रेल्वेची मनमानी!
डॉ श्रीकांत शिंदे इकडेही लक्ष द्या,
शहाड रेल्वे स्टेशन वर तिकिट घरापासून तीनशे ते चारशेमीटर अंतरावर लावले बँरेकेट,दिव्यांगाची गैरसोय, नैसर्गिक आपत्तीत काय?रेल्वेची मनमानी!
कल्याण
(संजय कांबळे)
मध्यरेल्वेच्या मुख्य मार्गावरील कल्याण ते कसारा दरम्यान असलेल्या शहाड रेल्वे स्टेशन वर तिकीट घर/तिकीट हाँल पासून सुमारे तोनशे ते साडेतीनशे मीटर अंतरावर रेल्वेच्या बांधकाम विभागाने बँरेकेट लावले असून यामुळे दररोज प्रवास करणाऱ्या हजारो दिव्यांग बांधवाना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे, शिवाय येथे नैसर्गिक आपत्ती निर्माण झाल्यास किंवा पुर परिस्थिती उद्भवल्यास फायरब्रीगेडच्या गाड्या किंवा रुग्णवाहिका कशी जाणार असा प्रश्न पडला आहे, रेल्वेच्या या आडमुठ्या व मनमानी कारभारा विरोधात मोठ्या प्रमाणात तक्रारी करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
कल्याण कसारा मार्गावर शहाड हे महत्त्वाचे स्टेशन आहे, दररोज३०ते४०हजार प्रवासी या स्थानकातून प्रवास करतात.या स्टेशन च्या लगत पुर्वेला गेल्या १५ते२०वर्षापासून उल्हासनगर पालिकेच्या जागेवर अनाधिकृत पार्किंग सुरू होते,यातून रेल्वेच्या अधिका-यांना मलिदा भेटत होता अशी चर्चा आहे, परंतु उल्हासनगर पालिकेच्या उपायुक्त श्रीमती पवार मँडम यांनी ही अनाधिकृत पार्किंग हटवून पालिकेची जागा रिकामी करून येथे अधिकृत पार्किंग सुरू केली. पण हे रेल्वे ला पटले नाही, त्यांनी तिकीट घरापासून३००ते३५०मीटर अंतरावर मनमानी पणे बँरेकेट लावले, विशेष म्हणजे पश्चिमेला असे केले नाही, यामुळे दिंव्याग, वयोवृद्ध, गरोदर महिला, यांना ऐवढे अंतर चालत येवून तिकीट काढावे लागत आहे,
शिवाय येथे काही अपघात घडला, किंवा नैसर्गिक आपत्ती ओढावली तर येथे रुग्णवाहिका किंवा फायरब्रीगेडची गाडी यायला जागा नाही, तसेच बाजूला मोठा नाला आहे, येथे पुरपरिस्थिती निर्माण झाल्यास मदत कशी करणार?असा प्रश्न पडतो.कालच म्हणजे१७जून रोजी एका प्रवाशाला अपघात झाला तर त्याला उपचारासाठी इतके अंतर बाहेर जावे लागले, तेंव्हा रुग्णवाहिका मिळाली,२०२१मध्ये स्टेशनला आग लागली होती, त्यामुळे ही अशीच परिस्थिती निर्माण झाली होती.
येथे येण्यासाठी पर्यायी मार्ग गुलशननगर मधून येतो परंतु हे अंतर एक ते दिड किलोमीटर इतके आहे, याचबरोबर तो मार्ग प्लँटफार्म वर येतो,प्रत्येक महिन्याच्या १०तारखेला संपूर्ण महाराष्ट्रातून दिव्यांग बांधव उल्हासनगर येथे मोफत रेशन घेण्यासाठी येतात, त्यांची संख्या२००च्या वर असते, भारत राजपत्रात दिव्यांग प्रवाशांना रेल्वेत व प्लँटफार्म वर सोईसुविधा पुरवाव्यात असे निर्देश आहेत, शिवाय भारतीय रेल्वे दिव्यांग अधिकार अधिनियम२०१६चा आदेश आहे. तरीही रेल्वेच्या मनमानी व आडमुठ्या पणामुळे याचा नाहक त्रास प्रवासी व नागरिकांना होत आहे. असा इतर रेल्वे स्टेशन वर नाही, मग शहाड येथेच का?व कशासाठी?याबाबत रेल्वे मंत्रालय तसेच वरीष्ठ अधिकारी यांच्या कडे तक्रारी करण्यात आल्याची खात्रीशीर माहिती आहे.याविषयी रेल्वेचे अभियंता ललित सोंळकी यांना विचारले असता ते म्हणाले, बँरेकेट विषयी मंडळ रेल्वे प्रंबधक यांचे निर्देश आहेत व त्यानुसार हे काम केले आहे.
त्यामुळे कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी दिव्यांगांच्या तसेच ज्येष्ठ नागरिकांच्या अडीअडचणीला मुक्त करण्याकरिता लक्ष देण्याची मागणी रेल्वे प्रवास करणाऱ्या दिव्यांग बांधवांकडून होत आहे
Comments
Post a Comment