*बेस्ट कामगारांचे प्रश्न सुटणार*....*गजानन नागे* *कामगार मंत्री श्री आकाशजी फुंडकर यांचे संयुक्त बैठकीत बेस्ट प्रशासनाला आदेश*
*बेस्ट कामगारांचे प्रश्न सुटणार*....*गजानन नागे*
*कामगार मंत्री श्री आकाशजी फुंडकर यांचे संयुक्त बैठकीत बेस्ट प्रशासनाला आदेश*
मुंबई - कामगार मंत्री मा.ना. आकाशजी फुंडकर व भाजपा बेस्ट कामगार संघाचे सरचिटणीस तथा भाजपा कामगार मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष गजानन नागे यांचे उपस्थितीत बेस्ट कामगारांच्या विविध मागण्यांसाठी व बेस्ट कामगारांच्या पुढील येणाऱ्या काळात सुरक्षित भविष्यासाठीत्यांच्या मंत्रालयालयीन दालनात सभा घेण्यात आली. त्या सभेमध्ये कामगार सचिव श्रीमती कुंदन मॅडम,महानगरपालिकेचे सह आयुक्त, कामगार साह्यक आयुक्त श्री अतुल सावरकर तसेच बेस्ट प्रशासनाचे सह महाव्यवस्थापक श्री आनंद साखरे व इतर बेस्ट अधिकारी तथा व्हिजिलन्स डिपार्टमेंट , अकाऊंट डिपार्टमेंट , वाहतूक डिपार्टमेंट चें ऑडिटर विभागीय सर्व अधिकारी उपस्थित होते,श.
सर्वांच्या समक्ष चर्चेमध्ये २०१६-२०२१ च्या करारातील एरिअस व भत्ते अदा करणे,
रिटायर झालेले कामगारांची देणी ,सर्वांच्या रखडलेले कोविड भत्त्या बाबत चर्चा होऊन मंत्री महोदयांनी टप्प्या, टप्प्यात लवकर कोविड भत्ता देण्याचे आदेश दिले, तसेच ज्येष्ठतेनुसार ड्रायव्हर,कंडक्टर यांना बढती देण्याबाबत निर्णय झाला. रखडलेला एलटीए, विविध विभागात भरती बाबत निर्णय घेण्यात आला. २०२१-२०२६ चा करार लवकर करण्यात यावा. बेस्ट उपक्रमातील ३३३७ बस ताफा पूर्ण करण्यात यावा.बेस्ट अधिकाऱ्यांची दादागिरी खपवून घेणार नाही असा इशारा देण्यात आला.कामगारांसाठी महापालिकेने दिलेला निधी, कामगारांचे वेतन व इतर देणी देण्यासाठी वापरल्या गेला पाहिजे.अशी मागणी गजानन नागे यांनी केली. ती मान्य करण्यात आली.
तसेच सर्वांचा महानगरपालिकेमध्ये विलीनीकरणाचा विषय महत्त्वाचा मुद्दा म्हणून उपस्थित करण्यात आला. अशा प्रदीर्घ चर्चेत कामगार मंत्र्यांना महानगरपालिका प्रशासन तसेच बेस्ट प्रशासन कडून समर्पक उत्तरे देण्यात आलीत. या सगळ्या मागण्या महानगरपालिकेच्या निवडणुकांपूर्वी पूर्ण करण्यात येतील असे आश्वासन देण्यात आले.या बैठकीला कार्याध्यक्ष सिद्धार्थ पडसपगार, आनंद जरग, अनिल यादव, संतोष काटकर, मुकेश इंगवले,राजु लिहिणार, महादेव खांडे, विजय मावळे,पुथ्वीराज जाधव, झुंबर जाधव, आबा यादव आगार अध्यक्ष व सचिव युनियन चे प्रतिनिधी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.कामगार मंत्री महोदयांनी बेस्ट कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतल्याबध्दल बेस्ट उपक्रमात कामगारां कडून अभिनंदन व आभार व्यक्त करण्यात येत आहेत.
Comments
Post a Comment