खामगाव 2025- 26 कार्यकारणी अध्यक्ष म्हणून लॉ. तुषार कमानी,लॉ. डॉ. निरिष पवार सचिवतर. कुमाल भिसे कोषाध्यक्ष

खामगाव 2025- 26 कार्यकारणी अध्यक्ष म्हणून
लॉ. तुषार कमानी,
लॉ. डॉ. निरिष पवार सचिव
तर. कुमाल भिसे कोषाध्यक्ष
खामगाव 
 संतोष आटोळे 

सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या लॉयन्स क्लब खामगांव ला यावर्षी ५० वर्षे पूर्ण होत आहे या सुवर्ण महोत्सवी वर्षाची २०२५-२६ ची कार्यकारिणी नुकतीच गठीत करण्यात आली. यामध्ये अध्यक्षपदी लॉ. तुषार कमाणी, सचिवपदी लॉ. डॉ. गिरिश पवार तर कोषाध्यक्ष पदी लॉ. कुणाल भिसे यांची निवड करण्यात आली.

तसेच उर्वरीत कार्यकारिणीमध्ये अॅडव्हायजर म्हणून एमजेएफ लॉ. डॉ. अशोक बावस्कर, मा. आमदार लॉ. दिलीपकुमार सानंदा, लॉ. अनिल नावंदर, आयपीपी एमजेएफ लॉ. शंकर परदेशी, फर्स्ट व्हीपी लॉ. पिनेश कमाणी, सेकंड व्हीपी लॉ. नंदकिशोर देशमुख, थर्ड व्हीपी लॉ. डॉ. धनंजय तळवणकर, सहसचिव लॉ. मितेश कमाणी, सहकोषाध्यक्ष लॉ. लुकेश मुदलीयार, ट्रेलट्ठिस्टर लॉ. अभिजित मेहता, टेमर लॉ. आनंद परदेशी, मेंबरशिप कमेटी लॉ. अशोक केला, एमजेएफ लॉ. किशोर गरड, एमजेएफ लॉ. निखिल लाठे, पास्ट प्रेसिडेंट फोरम एमजेएफ लॉ. आर.जी. भुतडा, लॉ. अशोक चांडक, एमजेएफ लॉ. दिनेश गांधी, एलसीआयएफ कोऑर्डीनेटर लॉ.डॉ. सुरेखा मेंढे, लॉ. गिरिराज डागा, एमजेएफ लॉ. महेश चांडक, क्लब सव्हींस चेअरपर्सन लॉ. डॉ. संजीव राठोड, लॉ. निर्मला जैन, लॉ. मोनिका पनपालीया, क्लब मार्केटींग कमेटी एमजेएफ लॉ. तेजस झांबड, लॉ. भगवान बरडे, लॉ. कुलबिरसिंग पोपली, पीआरओ लॉ.डॉ. परमेश्वर चव्हाण, लॉ. श्रमिक जयस्वाल, लॉ. विजय मोरखडे, बुलेटीन एडीटर लॉ. राहुल भट्टड, लॉ. जितेंद्र होतवाणी, लॉ. अमरजितसिंग बग्गा, लिओ अॅडव्हायझर एमजेएफ लॉ.डॉ. अपर्णा बावस्कर, लॉ. धर्मेश शहा, डायरेक्टर २०२४-२६ व २०२५-२६ यांची निवड करण्यात आली आहे.

अशी माहिती प्रसिध्दी प्रमुख लॉ. डॉ. परमेश्वर चव्हाण, लॉ. श्रमिक जयस्वाल व लॉ. विजय मोरखडे यांनी प्रसिध्दीप्रत्रकाव्दारे दिली आहे.

Comments

Popular Posts

*नम्रता गणेशराव धोत्रे कौलखेड अकोला या लाडक्या बहिणी विरुद्ध मलकापूर पो. स्टे. ला महाराष्ट्रातून पहिली तक्रार दाखल. मलकापूर (दिव्यांग शक्ती प्रतिनिध)ी*नुकताच महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना जाहिर केली मात्र अपात्र महिलांनीही या योजनेचा लाभ घेतल्याचे दिसत आहे.अर्जदार महीला नम्रता यांनी प्रथमतः दि. ३०-०८-२०२४ रोजी योजनेचा अर्ज केला व अंतिमतः दि. ०२-०९-२०२४ रोजी त्यांचा शासनाद्वारे अर्ज मंजुर करण्यात आला आहे व त्याप्रमाणे प्रस्तुत अर्जदार हिस दरमहा १५००/- रूपये प्रमाणे निधी तिचे खात्यात प्राप्त झाला आहे. खरे म्हणजे अर्जदार नम्रता हिने खोटे व बनावटी हमीपत्राचा दस्त तयार करून त्यात खोटी व बनावटी माहित दिली व तो खरा आहे असे भासवुना जाणीव पूर्वक सदर दस्त संबंधीत अधिकाऱ्यांकडे सादर केला.त्याद्वारे शासनाची फसवणुक करून स्वतःचा गैरहक्की आर्थिक लाभ प्राप्त केला आहे.याबाबत सविस्तर असे की सदर योजने करीता पात्रता निकष असे की,ज्या महिलेच्या एकत्रीत कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २,५०,००० /- रूपयांपेक्षा अधिक आहे, ज्या कुटूंबातील सदस्य आयकर दाता आहे, ज्या कुटूंबातील व्यक्ती सरकारी कर्मचारी म्हणुन सेवानिवृत्ती नंतर सेवानिवृत्ती वेतन घेतात, ज्यांच्या कुटूंबात चारचाकी वाहन आहे किंवा ज्या कुटूंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकर पेक्षा जास्त शेतजमिन आहे अशा महिला या योजनेसाठी पात्र ठरत नाही. पात्र अर्जदार लाडक्या बहिणीला तसे हमीपत्र सुद्धा द्यावे लागते.असे निकष असताना अर्जदार लाडकी बहिण नम्रता हिने तिचे लग्नानंतरचे नावाने अर्ज केला आहे. सदर अर्जदार हिचे सासर कडील एकत्र कुटूंबाचे उत्पन्न अडीच लाख पेक्षा जास्त आहे, सदर अर्जदार हिचे सासरे सेवानिवृत्ती वेतन घेतात, त्यांचे पती दिपक चांभारे पाटील नावाने एकुण ६ एकर शेतजमिन आहे. म्हणजेच निकषाप्रमाणे पाच एकर पेक्षा जास्त शेतजमिन आहे. असे असतांना देखील व सदरची बाब पुर्णतः माहिती व जाणीवेतील असतांना देखील प्रस्तुत अर्जदार हिने खोटे हमीपत्र निष्पादीत केले व सदर हमीपत्र व त्यातील मजकुर खोटा आहे याची माहिती व जाणीव असतांना गैरहक्की आर्थिक लाभाचे दुषित हेतुने त्याचा वापर करून शासनाची फसवणुक केली आहे व स्वतःचा आर्थिक लाभ प्राप्त करून घेतला आहे.प्रस्तुत अर्जदार ही तिचे पतीपासून गेल्या पाच ते सहा वर्षापासुन विभक्त राहत आहे. त्यांचेदरम्यान अकोला येथील न्यायालयात खावटीकरीता न्यायालयीन प्रकरणे सुरू असून सदर अर्जदार हिस तिचे पतीपासून एकत्रीतरित्या दरमहा ५०,००० /- रूपये खावटी मंजुर झाल्याची देखील तक्रारीत नमूद आहे. सबब निकषास पात्र नसतांना देखील खोटी माहिती देवून व खरी माहिती लपवून सदर अर्जदार हिने योजनेचा लाभ मिळविला आहे. सदर अर्जदार हिचे माहेरचे नांव नम्रता गणेश धोत्रे आहे व सदर धोत्रे परिवारात चारचाकी वाहन आहे व त्या परिवाराचे उत्पन्न देखील अडीच लाखापेक्षा जास्त आहे. असे असतांना स्वतःचे वैवाहिकस्थितीबाबत खोटी माहिती प्रस्तुत अर्जदाराने दिली असून शासनाची फसवणुक केली आहे व स्वतःचा गैरहक्की फायदा करून घेतला आहे.सदर महिती जनमाहिती अधिकारी तथा नायब तहसिलदार, मलकापूर यांचेकडून अर्ज व त्यासोबतची कागदपत्र यांची माहिती अधिकार कायद्याअंतर्गत मागणी केली असता. अर्जदार नम्रता यांनी खोटे हमीपत्र तयार करून त्यात खोटी माहिती देऊन शासनाची फसवणुक केल्याबाबतची व स्वतःचा गैरहक्की फायदा करून घेतला असल्याचे दिसले. नम्रता यांचे सदरचे कृत्य दखलपात्र स्वरूपाचा गुन्हा असून त्याबाबत त्यांच्या विरूध्द मलकापूर पो. स्टे. ला फिर्याद श्री. राजेंद्र काजळे यांनी दिली आहे.