नांदुरा येथे दुचाकी MH28AR6517 चोरीप्रकरणी अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल
नांदुरा येथे दुचाकी चोरीप्रकरणी अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल
नांदुरा.-(दिव्यांग शक्ती)
स्थानिक मानकर हॉस्पिटल समोरून अज्ञात चोरट्याने दुचाकी लंपास केल्याची घटना २२ मे २०२५ रोजी सकाळी ११.३० वाजेदरम्यान घडली. याप्रकरणी अइ गात आरोपीविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत फिर्यादी अनंता विठ्ठल हागे (वय ४५) रा. येरळी ह.मु. पोलीस वसाहत मागे नांदुरा यांनी पोलीस स्टेशनला तक्रार दिली. त्यानुसार फिर्यादी त्यांचे वडील व गावातील आजारी लक्ष्मण पवार यांना पाहण्यासाठी आपली दुचाकी क्रमांक एमएच २८-एआर ६५१७ अंदाजे किंमत ४० हजार रुपये घेऊन आले होते. दुचाकी हॉस्पिटल बाहेर जाऊन रुग्णांना भेटून बाहेर आलो असता दुचाकी दिसून आली नाही. त्यानंतर इतरत्र शोध घेतला असता दुचाकी मिळून आली नाही. फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध भारतीय न्याय संहिता ३०३ (२) कलमाखाली गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सहाय्यक फौजदार मिलिंद जवंजाळ करित आहे
Comments
Post a Comment