एखादे अपयश हे आपलं भविष्य ठरवत नसते- अनिरूद्ध बक्षी.लोकस्वातंत्र्य पत्रकार पत्रकार महासंघाचा विचारमंथन मेळावा

एखादे अपयश हे आपलं भविष्य ठरवत नसते- अनिरूद्ध बक्षी.
लोकस्वातंत्र्य पत्रकार पत्रकार महासंघाचा विचारमंथन मेळावा....गोवा राज्य प्रमुख नव्या नियुक्तीची माहिती.
 सुचिता पाटेकर व अनिरूद्ध बक्षी यांचे हस्ते शालेय बॅगा व सन्मान चिन्ह देऊन गुणवंत विद्यार्थी गौरव व पदाधिकारी सन्मान
मनोज भगत
अकोला जि प्र

अकोला- आयुष्यातला एखादा पराभव किंवा अपयश हे भविष्य ठरवत नसते.हे समजण्याठी विद्यार्थ्यांची युवापिढी ही शैक्षणिक प्रगतीसोबतच भाषा,संवाद आणि सोशलमिडीयाच्या पलिकडे जाऊन मानसिकदृष्ट्या सक्षम झाली पाहिजे. असे वातावरण निर्माण करून त्यांना घडवणे ही पालक आणि समाजातल्या थोरा मोठ्यांची जबाबदारी आहे.असे महत्वपूर्ण प्रतिपादन बाळापूर महसूल विभागाचे उपविभागीय अधिकारी अनिरूद्ध बक्षी यांनी केले.लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या ४५ वा मासिक विचारमंथन मेळाव्यात ते अध्यक्षपदावरून बोलत होते. याप्रसंगी लोकस्वातंत्र्य सभासदांच्या  १० वी  व १२ वी तील  गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रमुख अतिथी सुचिताताई पाटेकर जिल्हा शिक्षणाधिकारी, माध्यमिक व एस.डी.ओ.बक्षी यांच्या हस्ते प्रोत्साहनपर सन्मानचिन्ह व दर्जेदार शालेय बॅगा भेट देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ समाजसेवक प्रा.राजाभाऊ देशमुख व अकोला पंचायत समितीचे डॉ.उल्हास मोकळकर,विस्तार अधिकारी पंचायत हे प्रमुख अतिथी म्हणून तर लोक स्वातंत्र्यचे संस्थापक- राष्ट्रीय अध्यक्ष संजय एम.देशमुख,उपाध्यक्ष प्रदिप खाडे यांची विचार मंचावर प्रमुख उपस्थिती होती.

      सर्वप्रथम लोकस्वातंत्र्य सामाजिक अधिष्ठाता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व कर्मयोगी संत गाडगे महाराज यांना वंदन,अभिवादन करण्यात आले.शहिद जवान,अत्त्यारचारग्रस्त अश्विनी हगवणे व ईतर महिला, आत्महत्त्याग्रस्त शेतकरी, शास्त्रज्ञ जयंत नारळीकर, आपत्ती व अपघातातील बळी,व दिवंगत पत्रकारांना यावेळी श्रध्दांजली वाहण्यात आली. तनिष्क देशमुख,यदुराज काटे,ध्रूवेश देशमुख,ययांत देशमुख,सृष्टी लोडम,आकांक्षा अग्रवाल,आर्या देशमुख,धनश्री देशमुख,शरयु पागृत,कृष्णाई देशमुख, दृष्टी इंगोले, या व ईतर विद्यार्थ्या़ंना सन्मानित करण्यात आले.

  शिक्षणाधिकारी सुचिताताई पाटेकर यांनी लोकस्वातंत्र्यचे उपक्रम तथा पत्रकार व सामाजिक कल्याणाच्या वाटचालीचा गौरव केला.प्रज्ञावंतांच्या गुणगौरवाप्रमाणेच सामान्य उपेक्षित विद्यार्थ्यांसाठी सुध्दा आनंददायी संकल्पना राबविण्याच्या अपेक्षा संघटनेकडून व्यक्त केल्या.संघटनाध्यक्ष संजय एम.देशमुख यांनी समाज आणि पत्रकार कल्याणाच्या वर्तमान संघर्षाची आणि आगामी उपक्रमांची माहिती देऊन लोक स्वातंत्र्याच्या गोवा राज्य प्रमुख नियुक्तीची कल्पना याप्रसंगी दिली.सौ.सोनल अग्रवाल यांनी त्यांच्याविरूद्ध झालेल्या जादुटोणा षडयंत्र प्रकरणी व त्यांच्या दुसऱ्या सहकारी महिलेला कौटुंबिक छळवणूक घटनेत लोकस्वातंत्र्य कडून झालेल्या मदतीची माहिती दिली‌.  यावेळी उल्हास मोकळकर यांनी संघटन कार्य व वाटचालीची प्रशंसा करून शुभेच्छा दिल्यात.

    प्रा.महादेव उर्फ देवबाबू लूले यांचे बहारदार संचलनाखाली झालेल्या या कार्यक्रमास राष्ट्रीय सचिव राजेन्द्र देशमुख,युवा कादंबरीकार पुष्पराज गावंडे,अॕड.राजेश जाधव,सिध्देश्वर देशमुख,सौ.जया भारती इंगोले,संदिप देशमुख,अॕड.नितीन धुत,संदिप देशमुख,शंकरराव सांगळे,संतोष धरमकार,मनोहर मोहोड,अनिल मावळे,रमेश समुद्रे,सुरेश पाचकवडे,अंबादास तल्हार,जिल्हाध्यक्ष पंजाबराव वर,ग्रामीण जिल्हाध्यक्ष सागर लोडम,शशिकांतराव देशमुख,अॕड.कृष्णराव देशमुख,विजयराव बाहकर,सौ.जयमाला देशमुख,
गजानन कावरे,गजानन ढवळे,आशिष काळे (चांदुर बाजार), के.व्ही.देशमुख,प्रा.विजयराव काटे,आशिष वानखडे पाटील,जयंत देशमुख,सुरेश भारती, मनोज देशमुख,गजानन मुऱ्हे,कृष्णा चव्हाण,डॉ.अशोक सिरसाट,संतोषकुमार गवई,दिपक शर्मा,सतिश देशमुख( विश्व प्रभात),दिलीप नवले,मनोज भगत ( हिवरखेड), धारेराव देशमुख,वसंतराव देशमुख,अशोककुमार पंड्या,नंदश्याम कुकडकर,अजय वाचनाकडे,गौरव देशमुख,कैलास टकोरे,अथर्व देशमुख, दिपक सिरसाट,संघपाल सिरसाठ,जगन्नाथ गव्हाचे, डॉ.अशोक तायडे,तुळशीराम झटाले,अर्जूनराव घुगे, व अनेक पत्रकार उपस्थित होते.स्नेहभोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली.आभारप्रदर्शन राष्ट्रीय पदाधिकारी सौ.जया भारती इंगोले यांनी केले.

Comments

Popular Posts

*नम्रता गणेशराव धोत्रे कौलखेड अकोला या लाडक्या बहिणी विरुद्ध मलकापूर पो. स्टे. ला महाराष्ट्रातून पहिली तक्रार दाखल. मलकापूर (दिव्यांग शक्ती प्रतिनिध)ी*नुकताच महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना जाहिर केली मात्र अपात्र महिलांनीही या योजनेचा लाभ घेतल्याचे दिसत आहे.अर्जदार महीला नम्रता यांनी प्रथमतः दि. ३०-०८-२०२४ रोजी योजनेचा अर्ज केला व अंतिमतः दि. ०२-०९-२०२४ रोजी त्यांचा शासनाद्वारे अर्ज मंजुर करण्यात आला आहे व त्याप्रमाणे प्रस्तुत अर्जदार हिस दरमहा १५००/- रूपये प्रमाणे निधी तिचे खात्यात प्राप्त झाला आहे. खरे म्हणजे अर्जदार नम्रता हिने खोटे व बनावटी हमीपत्राचा दस्त तयार करून त्यात खोटी व बनावटी माहित दिली व तो खरा आहे असे भासवुना जाणीव पूर्वक सदर दस्त संबंधीत अधिकाऱ्यांकडे सादर केला.त्याद्वारे शासनाची फसवणुक करून स्वतःचा गैरहक्की आर्थिक लाभ प्राप्त केला आहे.याबाबत सविस्तर असे की सदर योजने करीता पात्रता निकष असे की,ज्या महिलेच्या एकत्रीत कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २,५०,००० /- रूपयांपेक्षा अधिक आहे, ज्या कुटूंबातील सदस्य आयकर दाता आहे, ज्या कुटूंबातील व्यक्ती सरकारी कर्मचारी म्हणुन सेवानिवृत्ती नंतर सेवानिवृत्ती वेतन घेतात, ज्यांच्या कुटूंबात चारचाकी वाहन आहे किंवा ज्या कुटूंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकर पेक्षा जास्त शेतजमिन आहे अशा महिला या योजनेसाठी पात्र ठरत नाही. पात्र अर्जदार लाडक्या बहिणीला तसे हमीपत्र सुद्धा द्यावे लागते.असे निकष असताना अर्जदार लाडकी बहिण नम्रता हिने तिचे लग्नानंतरचे नावाने अर्ज केला आहे. सदर अर्जदार हिचे सासर कडील एकत्र कुटूंबाचे उत्पन्न अडीच लाख पेक्षा जास्त आहे, सदर अर्जदार हिचे सासरे सेवानिवृत्ती वेतन घेतात, त्यांचे पती दिपक चांभारे पाटील नावाने एकुण ६ एकर शेतजमिन आहे. म्हणजेच निकषाप्रमाणे पाच एकर पेक्षा जास्त शेतजमिन आहे. असे असतांना देखील व सदरची बाब पुर्णतः माहिती व जाणीवेतील असतांना देखील प्रस्तुत अर्जदार हिने खोटे हमीपत्र निष्पादीत केले व सदर हमीपत्र व त्यातील मजकुर खोटा आहे याची माहिती व जाणीव असतांना गैरहक्की आर्थिक लाभाचे दुषित हेतुने त्याचा वापर करून शासनाची फसवणुक केली आहे व स्वतःचा आर्थिक लाभ प्राप्त करून घेतला आहे.प्रस्तुत अर्जदार ही तिचे पतीपासून गेल्या पाच ते सहा वर्षापासुन विभक्त राहत आहे. त्यांचेदरम्यान अकोला येथील न्यायालयात खावटीकरीता न्यायालयीन प्रकरणे सुरू असून सदर अर्जदार हिस तिचे पतीपासून एकत्रीतरित्या दरमहा ५०,००० /- रूपये खावटी मंजुर झाल्याची देखील तक्रारीत नमूद आहे. सबब निकषास पात्र नसतांना देखील खोटी माहिती देवून व खरी माहिती लपवून सदर अर्जदार हिने योजनेचा लाभ मिळविला आहे. सदर अर्जदार हिचे माहेरचे नांव नम्रता गणेश धोत्रे आहे व सदर धोत्रे परिवारात चारचाकी वाहन आहे व त्या परिवाराचे उत्पन्न देखील अडीच लाखापेक्षा जास्त आहे. असे असतांना स्वतःचे वैवाहिकस्थितीबाबत खोटी माहिती प्रस्तुत अर्जदाराने दिली असून शासनाची फसवणुक केली आहे व स्वतःचा गैरहक्की फायदा करून घेतला आहे.सदर महिती जनमाहिती अधिकारी तथा नायब तहसिलदार, मलकापूर यांचेकडून अर्ज व त्यासोबतची कागदपत्र यांची माहिती अधिकार कायद्याअंतर्गत मागणी केली असता. अर्जदार नम्रता यांनी खोटे हमीपत्र तयार करून त्यात खोटी माहिती देऊन शासनाची फसवणुक केल्याबाबतची व स्वतःचा गैरहक्की फायदा करून घेतला असल्याचे दिसले. नम्रता यांचे सदरचे कृत्य दखलपात्र स्वरूपाचा गुन्हा असून त्याबाबत त्यांच्या विरूध्द मलकापूर पो. स्टे. ला फिर्याद श्री. राजेंद्र काजळे यांनी दिली आहे.