विरोधात बातमी का छापली तुला संपवून टाकतो अशी धमकी देणाऱ्या आमदारा विरोधात पत्रकार देणार मुख्यमंत्र्यांना निषेध निवेदन
विरोधात बातमी का छापली तुला संपवून टाकतो अशी धमकी देणाऱ्या आमदारा विरोधात पत्रकार देणार मुख्यमंत्र्यांना निषेध निवेदन
नांदेड (धनाजी जोशी)
हादगाव येथील दैनिक देशोन्नतीचे पत्रकार श्री. संजय सूर्यवंशी यांना हादगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार बाबुराव कोहळीकर यांनी "तू माझ्या विरोधात बातमी का दिलास? तुला संपवून टाकतो" अशी थेट जीवे मारण्याची धमकी दिली, ही घटना अत्यंत निषेधार्थ आणि पत्रकार स्वातंत्र्यावर झालेला घातक हल्ला आहे.
या घटनेचा तीव्र निषेध करण्यासाठी आणि संबंधित आमदारांवर योग्य ती कायदेशीर कारवाई व्हावी यासाठी पत्रकार संरक्षण समितीचे अध्यक्ष शेख असलम यांच्या नेतृत्वाखाली उद्या सकाळी ११ वाजता देगलूर येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयामार्फत मा. मुख्यमंत्री महोदयांना निवेदन सादर करण्यात येणार आहे.
तरी देगलूर तालुक्यातील सर्व पत्रकार बांधवांनी वेळेवर उपस्थित राहून पत्रकारांच्या न्यायहक्कासाठी एकत्र यावे,
असे आवाहन
धनाजी जोशी
पत्रकार संरक्षण समिती प्रसिध्दी प्रमुख यांनी केले आहे
Comments
Post a Comment