*पत्रकारास धमकी देणारे आ. कोहळीकर यांच्यावर कार्यवाही करा**•••पत्रकार संरक्षण समितीचे मुख्यमंत्र्यांना निवेदन•••*

*पत्रकारास धमकी देणारे आ. कोहळीकर यांच्यावर कार्यवाही करा*

*•••पत्रकार संरक्षण समितीचे मुख्यमंत्र्यांना निवेदन•••*

*देगलूर (धनाजी जोशी)
       हदगाव येथील दैनिक देशोन्नतीचे तालुका प्रतिनिधी पत्रकार संजय सुर्यवंशी यांनी "मौजे निवघा तळणी सर्कलमधील पंचवीस गावे २५ तासांपासून अंधारात, महावितरणचे अधिकारी नॉट रिचेबल" या मथळ्याखाली वस्तुनिष्ठ बातमी प्रकाशित केली.
       या बातमीनंतर हदगाव-हिमायतनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांनी संबंधित पत्रकाराला अश्लील भाषेत शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे.

या प्रकाराचा पत्रकार संरक्षण समितीने तीव्र निषेध करत, ही घटना पत्रकार स्वातंत्र्यावर थेट आघात करणारी असल्याचे म्हटले आहे. समितीचे तालुकाध्यक्ष शेख असलम यांनी, "सत्य मांडणाऱ्या पत्रकारांना धमक्या देणे म्हणजे लोकशाही मूल्यांची पायमल्ली आहे," असे म्हणत संबंधित आमदारावर तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.

या प्रकरणाची सखोल चौकशी करून आमदार कोहळीकर यांच्यावर कठोर कारवाई करावी, अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

या निवेदनावर पत्रकार संरक्षण समितीचे अध्यक्ष शेख असलम, सचिव गजानन टेकाळे, कार्याध्यक्ष धनाजी देशमुख, प्रसिद्धीप्रमुख धनाजी जोशी, पत्रकार सेवा संघाचे राज्य उपाध्यक्ष विशाल पवार, इलेक्ट्रॉनिक मीडिया अध्यक्ष सय्यद समी, तसेच सुनील मदनुरे, प्रभू वंकलवार, अनिल पवार, संजय हाळदे, इस्माईल खान यांच्यासह अनेक पत्रकारांच्या स्वाक्षऱ्या आहेत. पत्रकारांच्या सुरक्षेसाठी शासनाने तात्काळ पावले उचलावीत, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

Comments

Popular Posts

*नम्रता गणेशराव धोत्रे कौलखेड अकोला या लाडक्या बहिणी विरुद्ध मलकापूर पो. स्टे. ला महाराष्ट्रातून पहिली तक्रार दाखल. मलकापूर (दिव्यांग शक्ती प्रतिनिध)ी*नुकताच महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना जाहिर केली मात्र अपात्र महिलांनीही या योजनेचा लाभ घेतल्याचे दिसत आहे.अर्जदार महीला नम्रता यांनी प्रथमतः दि. ३०-०८-२०२४ रोजी योजनेचा अर्ज केला व अंतिमतः दि. ०२-०९-२०२४ रोजी त्यांचा शासनाद्वारे अर्ज मंजुर करण्यात आला आहे व त्याप्रमाणे प्रस्तुत अर्जदार हिस दरमहा १५००/- रूपये प्रमाणे निधी तिचे खात्यात प्राप्त झाला आहे. खरे म्हणजे अर्जदार नम्रता हिने खोटे व बनावटी हमीपत्राचा दस्त तयार करून त्यात खोटी व बनावटी माहित दिली व तो खरा आहे असे भासवुना जाणीव पूर्वक सदर दस्त संबंधीत अधिकाऱ्यांकडे सादर केला.त्याद्वारे शासनाची फसवणुक करून स्वतःचा गैरहक्की आर्थिक लाभ प्राप्त केला आहे.याबाबत सविस्तर असे की सदर योजने करीता पात्रता निकष असे की,ज्या महिलेच्या एकत्रीत कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २,५०,००० /- रूपयांपेक्षा अधिक आहे, ज्या कुटूंबातील सदस्य आयकर दाता आहे, ज्या कुटूंबातील व्यक्ती सरकारी कर्मचारी म्हणुन सेवानिवृत्ती नंतर सेवानिवृत्ती वेतन घेतात, ज्यांच्या कुटूंबात चारचाकी वाहन आहे किंवा ज्या कुटूंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकर पेक्षा जास्त शेतजमिन आहे अशा महिला या योजनेसाठी पात्र ठरत नाही. पात्र अर्जदार लाडक्या बहिणीला तसे हमीपत्र सुद्धा द्यावे लागते.असे निकष असताना अर्जदार लाडकी बहिण नम्रता हिने तिचे लग्नानंतरचे नावाने अर्ज केला आहे. सदर अर्जदार हिचे सासर कडील एकत्र कुटूंबाचे उत्पन्न अडीच लाख पेक्षा जास्त आहे, सदर अर्जदार हिचे सासरे सेवानिवृत्ती वेतन घेतात, त्यांचे पती दिपक चांभारे पाटील नावाने एकुण ६ एकर शेतजमिन आहे. म्हणजेच निकषाप्रमाणे पाच एकर पेक्षा जास्त शेतजमिन आहे. असे असतांना देखील व सदरची बाब पुर्णतः माहिती व जाणीवेतील असतांना देखील प्रस्तुत अर्जदार हिने खोटे हमीपत्र निष्पादीत केले व सदर हमीपत्र व त्यातील मजकुर खोटा आहे याची माहिती व जाणीव असतांना गैरहक्की आर्थिक लाभाचे दुषित हेतुने त्याचा वापर करून शासनाची फसवणुक केली आहे व स्वतःचा आर्थिक लाभ प्राप्त करून घेतला आहे.प्रस्तुत अर्जदार ही तिचे पतीपासून गेल्या पाच ते सहा वर्षापासुन विभक्त राहत आहे. त्यांचेदरम्यान अकोला येथील न्यायालयात खावटीकरीता न्यायालयीन प्रकरणे सुरू असून सदर अर्जदार हिस तिचे पतीपासून एकत्रीतरित्या दरमहा ५०,००० /- रूपये खावटी मंजुर झाल्याची देखील तक्रारीत नमूद आहे. सबब निकषास पात्र नसतांना देखील खोटी माहिती देवून व खरी माहिती लपवून सदर अर्जदार हिने योजनेचा लाभ मिळविला आहे. सदर अर्जदार हिचे माहेरचे नांव नम्रता गणेश धोत्रे आहे व सदर धोत्रे परिवारात चारचाकी वाहन आहे व त्या परिवाराचे उत्पन्न देखील अडीच लाखापेक्षा जास्त आहे. असे असतांना स्वतःचे वैवाहिकस्थितीबाबत खोटी माहिती प्रस्तुत अर्जदाराने दिली असून शासनाची फसवणुक केली आहे व स्वतःचा गैरहक्की फायदा करून घेतला आहे.सदर महिती जनमाहिती अधिकारी तथा नायब तहसिलदार, मलकापूर यांचेकडून अर्ज व त्यासोबतची कागदपत्र यांची माहिती अधिकार कायद्याअंतर्गत मागणी केली असता. अर्जदार नम्रता यांनी खोटे हमीपत्र तयार करून त्यात खोटी माहिती देऊन शासनाची फसवणुक केल्याबाबतची व स्वतःचा गैरहक्की फायदा करून घेतला असल्याचे दिसले. नम्रता यांचे सदरचे कृत्य दखलपात्र स्वरूपाचा गुन्हा असून त्याबाबत त्यांच्या विरूध्द मलकापूर पो. स्टे. ला फिर्याद श्री. राजेंद्र काजळे यांनी दिली आहे.