विजय सोनार सर यांना 'शिवसेना' पक्षाच्या 'शिक्षकसेने'चा दिव्यांग प्रवर्गातून सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात विशेष कामगिरी केल्याबद्दल हा पुरस्कार
देवळाली कॅम्प -
(बबलू मिर्झा )
सरस्वती एज्युकेशन सोसायटी संचलित देवळाली हायस्कूलचे लिपिक श्री विजय सोनार सर यांना 'शिवसेना' पक्षाच्या 'शिक्षकसेने'चा दिव्यांग प्रवर्गातून सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात विशेष कामगिरी केल्याबद्दल हा पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला.
रावसाहेब थोरात सभागृह, नाशिक येथे खासदार भास्करराव भगरे, शिवसेनेचे सचिव भाऊसाहेब चौधरी, विजय करंजकर, संग्राम करंजकर शिक्षक आमदार किशोर दराडे एन डी एस टी पतसंस्थेचे संचालक मंडळ आदींच्या उपस्थितीत देण्यात आला. श्री विजय सोनार सर यांनी शारीरिक अपंगत्वावर मात करत आपली नोकरी सांभाळू 'माहिती अधिकार कार्यकर्ते' म्हणून तसेच 'प्रहार' संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष म्हणून काम करीत आहेत. त्यांच्या या कामाची दखल घेऊन त्यांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. याआधी ही श्री सोनार सर यांना 'इंडिपेंडेंट टीचर्स युनियन' (इस्तू) संघटनेचा पुरस्कार मिळालेला आहे. पुरस्कार वितरण प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक श्री हेमंत मोजाड, वरिष्ठ शिक्षक श्री किशोर शिंदे, सौ. रुपाली भामरे, श्री. सोमनाथ धात्रक सेवानिवृत्त शिक्षक श्री संजय मोरे, श्री. अतुल कुलथे,जितेंद्र माळवे, सखाराम काळे आदी उपस्थित होते.फ
Comments
Post a Comment