अखेर मलकापूर शिवसेना उबाठा च्या प्रयत्नांना यश 'त्या' चिमूरड्यास मिळाला न्याय...डॉ. राहुल रमेश चोपडे यांच्याविरुद्ध तब्बल एका वर्षा नंतर गुन्हा दाखल
अखेर मलकापूर शिवसेना उबाठा च्या प्रयत्नांना यश 'त्या' चिमूरड्यास मिळाला न्याय...
डॉ. राहुल रमेश चोपडे यांच्याविरुद्ध तब्बल एका वर्षा नंतर गुन्हा दाखल..
मलकापूर -
(दिव्यांग शक्ती)
मलकापूर येथील दुर्गेश विश्वनाथ भारंबे वय वर्ष २० याचा दिनांक १३/३/२०२४ रोजी अपघात झाल्याने त्याला डॉ. राहुल रमेश चोपडे यांच्याकडे उपचाराकरिता नेण्यात आले, उपचार झाल्यानंतर काही दिवसांनी त्याला असहाय्य त्रास सुरू झाला, तेव्हा त्याला परत डॉ. चोपडे यांच्याकडे नेण्यात आले परंतु त्यांनी केलेल्या निष्काळजीपणामुळे त्याचा त्रास कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढत जात होता. काही महिन्यांनी त्याला राज्यात व राज्याबाहेरील विविध डॉक्टरांकडे उपचारासाठी नेण्यात आले परंतु डॉ चोपडे चुकीच्या उपचार पद्धतीने पायात पस होऊन पाय पडल्याने उपचारच होऊ शकला नाही. दरम्यान त्याची आई पूनम विश्वनाथ भारंबे यांनी डॉ. राहुल चोपडे यांच्या निष्काळजीपणा बाबत ०४/०५/२४ रोजी मलकापूर पो. स्टे येथे तक्रार दाखल केली परंतु त्याची दखल न घेतल्यामुळे पूनमताई यांनी तालुकाप्रमुख दिपक चांभारे पाटील यांच्याशी संपर्क साधला. तेव्हापासून आजपर्यंत दिपक पाटील यांनी आक्रमक पवित्रा घेत सदर प्रकरणाचा पाठपुरावा सतत केला. त्यादरम्यान त्यांनी कधी शल्यचिकित्सक कार्यालय हादरवले तर कधी चक्क मलकापूरचे माजी ठाणेदार श्री. अनिल गोपाळ यांची चक्क उपहासात्मक आरतीच ओवाळून टाकली. आता तब्बल एक वर्षानंतर आज दि. ३१/०५/२५ रोजी सदर डॉ. राहुल चोपडे यांच्या विरुद्ध प्रथम खबर क्रमांक ३४०/२५ नुसार भारतीय दंड संहिता १८६० च्या कलम ३३८ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
बॉक्स
सामान्य लोकांच्या जेव्हा जेव्हा न्यायचा प्रश्न निर्माण होईल तेव्हा तेव्हा क्षेत्र कोणतेही असो विशेष करून रुग्णांचा प्रश्न कुठलाही धनदांडगा डॉक्टरच्या बेजबाबदारी पणामुळे रुग्णांवर अन्याय होत असेल किंवा त्याच्या जीवाच काही बर वाईट होत असेल तर आम्ही असे कधीच खपून घेणार नाही. मी जिल्ह्यातील सर्व लोकांना आव्हान करतो की अश्या स्वरूपात जर कोणी-कुठला डॉक्टर किंवा प्रशासन सामान्य नागरिकांना त्रास देत असेल तर तेव्हा मलकापूर उबाठा शिवसेना नेहमी तत्पर राहील.
----दिपक चांभारे पाटील,
शिवसेना, मलकापूर तालुकाप्रमुख यांनी प्रतिक्रिया दिली
तर
यासाठी सर्व प्रथम दिव्यांग शक्ती ने दखल घेतली होती
हे विशेष
Comments
Post a Comment