पोलीस प्रशासन तसेच पत्रकारांवर समाजमाध्यमांद्वारे खोट्या, दिशाभूल करणाऱ्या आणि आक्षेपार्ह टिपण्या करणाऱ्या अमोल सोनटक्के या व्यक्तीविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात यावी
पोलीस प्रशासन तसेच पत्रकारांवर समाजमाध्यमांद्वारे खोट्या, दिशाभूल करणाऱ्या आणि आक्षेपार्ह टिपण्या करणाऱ्या अमोल सोनटक्के या व्यक्तीविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात यावी
नांदुरा (संजय खानचंदानी)
अशी मागणी अमोल अरुण करुटले यांनी स्थानिक पोलीस निरीक्षकांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे की, अमोल सोनटक्के हा व्हॉट्सअॅपसारख्या समाजमाध्यमांवर पोलीस प्रशासन आणि पत्रकारांविरोधात सातत्याने खोटी टीका करतो, तसेच त्यांच्याबद्दल अपप्रचार करतो. त्याच्या टिपण्ण्या या आक्षेपार्ह, खोट्या आणि दिशाभूल करणाऱ्या असून, त्यामुळे समाजामध्ये पोलिसांबाबत गैरसमज पसरत आहेत व पत्रकारितेच्या विश्वासार्हतेवरही प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
विशेष म्हणजे, सोनटक्केने पत्रकारांवरही टीका केली असून, समाजातील शिस्तबद्ध काम करणाऱ्या या घटकाची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला आहे. तो व्हॉट्सअॅप ग्रुप्समधून सातत्याने चुकीची माहिती पसरवत असून, यामुळे समाजात संभ्रम निर्माण होत आहे.
या प्रकारामुळे कायदा व सुव्यवस्थेवर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे अशा वर्तनाची गंभीर दखल घेऊन, अमोल सोनटक्के याच्या विरोधात सखोल चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी अर्जदार अमोल अरुण करुटले यांनी केली आहे.
Comments
Post a Comment