शिवसेना खामगांव तालुका व शहर यांचे वतीने अवकाळी पाऊस वारा वादळामुळे शेतकऱ्याच्या मका ज्वारी केळी पिकाचे व फळबागचे झालेल्या नुकसान बाबत पंचनामे करून मदत मिळण्यासाठी निवेदन
शिवसेना खामगांव तालुका व शहर यांचे वतीने अवकाळी पाऊस वारा वादळामुळे शेतकऱ्याच्या मका ज्वारी केळी पिकाचे व फळबागचे झालेल्या नुकसान बाबत पंचनामे करून मदत मिळण्यासाठी निवेदन
खामगाव (संतोष आटोळे)
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे खामगांव तालुका व शहाराचे वतीने अवकाळी पाऊस वारा वादळामुळे शेतकऱ्याचे ज्वारी मका केळी इ. फळबागांचे नुकसान झाले त्यामुळे पेरणी अगोदर आलेल्या संकटामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे त्याकरिता खालील मागण्याचे निवेदन देण्यात आले 1. खामगांव तालुक्यात अवकाळी पावसामुळे वादळी वाऱ्यामुळे मका केळी ज्वारी व फळबाग ई. पिकाचे शेतकऱ्याचे नुकसान झाले त्याचे शासनाने पंचनामे करून नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत द्यावी 2 शेतकऱ्यांना निवडणुकीत दिलेल्या वचन नामा नुसार सर्व शेतकऱ्यांना तातडीने कर्जमाफी करून नवीन पिक कर्ज तातडीने देण्यात यावे 3 लाडक्या बहिणीना 2100 रुपयाचा हप्ता तातडीने त्याच्या खात्यात जमा करावा 4 नवीन रेशन कार्ड धारकांना तातडीने रेशन कार्ड देण्यात यावे इत्यादी मागण्याचे निवेदन देण्यात आले त्यावर तातडीने निर्णय घ्यावा याकरिता जिल्हा प्रमुख वसंतराव भोजने विधानसभा समन्व्यक भिकूलाल जैन तालुका प्रमुख श्रीराम खेलदार विधानसभा संघटक विजय बोदडे सुभाष ठाकूर रवि जैन दिनेश पतंगे महिलाआ ता प्रमुख श्रुतीताई पतंगे शहर प्रमुख बबिताताई हट्टेल नादाताई दुबे पल्लवीताई पाटील उपतालुका प्रमुख राधाकृष्ण गाढवे उप तालुका प्रमुख प्रकाश पवार विभाग प्रमुख रामेश्वर लहुडकार विभाग प्रमुख सहदेव पाटील भगवान पाटील विजय हागे सर्व शिवसैनिक पदाधिकारी नुकसान ग्रस्त शेतकरीउपस्थित होते
Comments
Post a Comment