पावसातही आरोग्य सेवेचा ओघ सुरूच; शेगावमध्ये मोफत आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
पावसातही आरोग्य सेवेचा ओघ सुरूच; शेगावमध्ये मोफत आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद..
शेगाव: (दिव्यांग शक्ती)
जीवन सेवा वेलनेस कंपनी ग्रुप, हैदराबाद यांच्या वतीने शुक्रवारी (दिनांक २५ मे २०२५) शेगाव येथील सत्कार भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य मोफत आरोग्य शिबिराला नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. विशेष म्हणजे, दिवसभर सुरू असलेल्या संततधार पावसातही सुमारे ३०० रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला.
शिबिरात रुग्णांची तपासणी करण्यात आली आणि त्यांना विविध थेरपीचा फायदा मिळाला. पावसाळी वातावरणामुळे रुग्णांच्या गर्दीवर कोणताही परिणाम झाला नाही, उलट नागरिकांचा आरोग्य सेवेबद्दलचा उत्साह दिसून आला.
या आरोग्य शिबिराला डॉ. नागनाथ देवकते हैदराबाद डॉ. चंद्रशेखर दुबई यांची विशेष उपस्थिती लाभली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर यशस्वीरीत्या पार पडले.
शिबिर यशस्वी करण्यासाठी डॉ. संतोष बडोलिया, डॉ. सुनील गव्हांदे, डॉ. दिलीप चव्हाण, डॉ. विनोद गणतिरे, अविनाश खोळके, श्रीकृष्ण सावळे, प्रशांत बकाल आणि विजय भालतिडक यांनी अथक परिश्रम घेतले. त्यांच्या प्रयत्नांमुळेच हे शिबिर नागरिकांसाठी उपयुक्त ठरले. जीवन सेवा वेलनेस कंपनी ग्रुपने आयोजित केलेल्या या शिबिरामुळे स्थानिक नागरिकांना मोफत आरोग्य तपासणी आणि उपचाराचा लाभ घेता आला.
Comments
Post a Comment