*गुणवंतांच्या पाठीवर कौतुकाची थाप* *गुंजकर एज्युकेशन हबमध्ये १० वी १२ वीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार*
*गुणवंतांच्या पाठीवर कौतुकाची थाप*
*गुंजकर एज्युकेशन हबमध्ये १० वी १२ वीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार*
खामगाव - (संतोष आटोळे)
शिक्षण क्षेत्रात उत्क्रांती घडविणाऱ्या प्रा. रामकृष्ण गुंजकर सरांच्या गुंजकर एज्युकेशन हबमध्ये दरवर्षीप्रमाणे काल २९ मे रोजी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी जिजाऊ स्कूल ऑफ स्कॉलर आवार मधील १० च्या व गुंजकर ज्युनिअर कॉलेजमधील १२ वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
नुकतेच निकाल जाहीर झालेल्या एचएससी परीक्षेत शहरातून प्रथम येण्याचा मान हा गुंजकर कॉलेजला मिळाला आहे. ही बाब कॉलेजसाठी नक्कीच अभिमानास्पद आहे, तसेच विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवणारी आहे. आजच्या गुंजकर एज्युकेशन हबचे नाव उंचावणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देत त्यांना प्रोत्साहित करण्याकरिता प्रा. रामकृष्ण गुंजकर सरांच्या संकल्पनेतून दरवर्षी प्रमाणे काल गुंजकर एज्युकेशन हबमध्ये सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामकृष्ण गुंजकर हे होते.तर संस्थेच्या सचिव सौ. सुरेखा गुंजकर, ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य सतीश रायबोले यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बारावी मधून प्रथम येण्याचा मान मिळविणारा स्पर्श मुनोत(९६%) दुसरी येणारी कु.रिद्धी जैन (९३.९०%) तिसरी येणारी कु. पलक संचेती (९३.८३%) सायन्स शाखेमधून प्रथम येणारी कु.सानिका गुंजकर (८८.१७% ) तसेच जिजाऊ स्कूल ऑफ स्कॉलरमध्ये दहावीत प्रथम येणारी प्रगती मेतकर(९५.६०% ) दुसरी येणारी श्रुती लाहुडकर (९४.४०%) तिसरी येणारी अनुष्का देशमुख (९३.६०%) यांचा तसेच इतर चांगले गुण मिळविणारे विद्यार्थी श्रुती भोरे 93.20%, सेजल खराटे 92.60%, अनुजा ढोरे 92.60%, ऋतुजा टिकार 91.60%, सानिका थेटे 91.40%, चेतन पांढरे 91.00%, जानवी ढोरे 90.40%, प्रणाली मेतकर
89.80%, जागृती रबडे 89.80%, पूजा वांडे 89.80%, आदित्य चिमकर
89.60, मेघा लगर 89.60%, ऋतुजा काळणे 89.60%, अर्जुन कापले 89.60%, ओम प्रकाश मस्के 89.20%, रोशन तायडे 89%, आर्यन नेरकर 88.20%, सेजल राजगुरु 88.20%, मयूर पाटेखेडे 88.80% आर्या जोहरने 87.60%, या विद्यार्थ्यांचा यथोचित स्मृतीचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन संस्थेच्या वतीने अध्यक्ष प्रा. गुंजकर सर यांनी सत्कार केला तसेच पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या सत्कार सोहळ्याला काही गुणवंत विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते.
Comments
Post a Comment