अभय योजनेअंतर्गत शास्तीच्या करामध्ये 30 जून पर्यंत मुदत वाढ द्यावी
अभय योजने अंतर्गत शास्तीच्या करामध्ये सूट मिळण्यासाठी नगर परिषदेने ३० जूनपर्यंत मुदतवाढ द्यावी l गणेशभाऊ चौकसे मित्र मंडळाची मागणी
खामगाव (संतोष आटोळे)
खामगाव नगर परिषदे मार्फत सद्यस्थितीत अभय योजनेअंतर्गत मालमत्ता धारकांना २ टक्के व्याजामध्ये सवलत मिळत असून योजनेचा लाभ देण्यासाठी ३ जून पर्यंत मुदत देण्यात आली आहे मात्र नागरिकांच्या सोयीसाठी या योजनेअंतर्गत सूट मिळण्यासाठी ३० जून पर्यंत मुदतवाढ द्यावी अशी मागणी गणेश भाऊ चौकसे मित्र मंडळाच्या वतीने महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. खामगाव नगरपरिषद मार्फत मालमत्ताधारकांना लावण्यात येणारी शासकीय थकबाकी असल्यास अतिरिक्त २ टक्के मासिक व्याज यामध्ये अवय योजनेअंतर्गत सूट मिळावी अशी मागणी गणेश भाऊ चौकशी मित्र मंडळाचे अध्यक्ष गणेश भाऊ चौकसे यांनी राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कडे एका निवेदनाद्वारे केली होती. यानंतर खामगाव नगर परिषदेच्या वतीने थकीत मालमत्ता कराचा भरणा करण्यासाठी लावण्यात येणारी शासकीय थकबाकी असल्यास अतिरिक्त २ टक्के मासिक व्याजामध्ये सूट देण्यात येत आहे सद्यस्थितीत नागरिक खामगाव नगर परिषदेमध्ये कराचा भरणा करण्यासाठी गर्दी करत आहेत. मात्र नगर परिषदेच्या वतीने नागरिकांच्या सुविधेसाठी यात ३ जून पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. परंतु सद्यस्थितीत शाळा महाविद्यालयामध्ये प्रवेशासाठी पालक व विद्यार्थी व्यस्त आहेत तसेच अवकाळी पावसामुळे व्यापारी तसेच नागरिक हवालदिल झालेला आहे. शेतकरी हे खरीप हंगामाचे शेती कामात व्यस्त आहेत त्यामुळे या योजनेचा अधिकाधिक लाभ घेण्यासाठी तसेच योजनेचा बट्ट्याबोळ होऊ नये यासाठी नागरिकांना सुविधा व्हावी या अनुषंगाने अभय योजनेची मुदत वाढ ३० जून पर्यंत वाढवणे गरजेचे आहे. खामगाव नगर परिषद प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे सन २०२५- २६ चे देयक नागरिकापर्यंत अद्यापही पोहोचलेले नाहीत. सद्यस्थितीत नगर परिषदेमध्ये कराचा भरणा करण्यासाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असून कराचा भरणा करण्यासाठी कर्मचाऱ्यांची कमतरता दिसून येत आहे त्यामुळे या विभागात कर्मचारी वाढवण्याची गरज आहे.तसेच नागरिकाकडून डिजिटल स्वरूपात पेमेंट स्वीकारण्यात येत नाही त्यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. तरी मालमत्ता धारकाकडून कराचा मोठ्या प्रमाणावर भरणा होणार आहे त्यामुळे अभय योजनेला ३० जून पर्यंत मुदतवाढ देण्यात यावी तसेच नागरिका करून डिजिटल स्वरूपात पेमेंट स्वीकारण्याबाबत योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश मुख्याधिकारी यांनी द्यावेत असेही निवेदनात नमूद केले आहे.l चौकट - अभय योजना लागू करण्याचा केला होता पाठपुरावा - खामगाव नगर परिषदेमार्फत मालमत्ताधारकांना लावण्यात येणारी शासकीय थकबाकी यामध्ये अतिरिक्त दोन टक्के मासिक व्याज यामध्ये अभय योजनेअंतर्गत सूट मिळावी अशी मागणी गणेशभाऊ चौकसे मित्र मंडळाच्या वतीने २६ मार्च रोजी राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे करण्यात आली होती त्यानंतर या निवेदनाची दखल घेऊन खामगाव नगर परिषदेने कराचा भरणा करण्यासाठी नागरिकांना अतिरिक्त २ टक्के मासिक व्याज कमी केले आहे. सद्यस्थितीत नागरिक कराचा भरणा करत असून याकरिता गणेशभाऊ चौकसे मित्र मंडळाने पाठपुरावा केला होता त्याचेच हे यश असल्याचे दिसून येत आहे.l बाईट - मालमत्ता धारकांना व्याजामध्ये १०० टक्के सूट मिळावी - अभय योजनेअंतर्गत थकीत मालमत्ताधारकांना कराचा भरणा करण्यासाठी मासिक व्याजामध्ये १०० टक्के सूट देण्यात यावी. तसेच राज्यातील नगरपरिषदा मालमत्ता धारकाकडून पठाणी पद्धतीने जी शास्तीकर वसूल करत आहे. त्यामध्ये नागरिकांना दिलासा देण्यासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यांनी लक्ष घालून त्वरित आदेश काढावेत. म्हणजे जनता खुशहाल होईल. असे गणेशभाऊ चौकसे, संस्थापक अध्यक्ष गणेशभाऊ चौकसे मित्र मंडळ च्या वतीने दिलेल्या नियोजनात कळविले आहे
Comments
Post a Comment