कलम 163 नुसार रेल्वेच्या जागेवर केलेल्या अतिक्रमण मुक्त संदर्भात आदेश 04/06/2025 ला कार्यवाही
कलम 163 नुसार रेल्वेच्या जागेवर केलेल्या अतिक्रमण मुक्त संदर्भात आदेश
04/06/2025 ला कार्यवाही
खामगाव
(संतोष आटोळे)
भारतीय नागरीक सुरक्षा संहिता कलम १६३ नुसार खामगाव उपविभागीय अधिकारी यांनी आदेश पारीत करीत खामगांव रेल्वे स्टेशन प्रशासनाच्या जमिनीवरील अतिक्रमण हटविण्याबाबत कलम १६३ भारतीय नागरीक सुरक्षा संहिता २०२३ प्रमाणे जमावबंदी मनाई आदेश जारी होनेबाबत व विशेष कार्यकारी दंडाधिकारी यांची नेमणूक होणेबाबत. जारी करण्यात आला आहे
या मध्ये
पोलीस स्टेशन अधिकारी खामगांव शहर यांचे पत्र गो.गा.क्र.६०२/२०२५ दि. २७/०५/२०२५. व सहा मंडल अभियंता (पश्चिम) सेंट्रल रेल्वे अकोला यांचे पत्र नं.AK/W/E-१.दि. २१/०५/२०२५ ज्याअर्थी पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन खामगांव शहर यांचे दिनांक २७/०५/२०२५ च्या पत्रान्वये सहा. मंडल अभियंता (पश्चिम) सेंट्रल रेल्वे अकोला यांचे दिनांक २६/०५/२०२५ चे पत्रानुसार खामगांव रेल्वे स्टेशन हद्दीत काही लोकांनी केलेले कच्चे पक्के अतिक्रमण केलेले असुन त्याबाबत रेल्वे प्रशासनाने अतिक्रमण काढण्याबाबत वारंवार सूचना देवुनही न काढल्याने दिनांक ०४/०६/२०२५ रोजी अतिक्रमण काढण्यात येणार असल्याचे कळविले आहे. व ज्याअर्थी त्या ठिकाणीच्या बहुतांश रहीवाशांनी रेल्वे प्रशासनाच्या जमिनीवरील केलेले अतिक्रमण काढण्यास विरोध केला असुन त्यावेळी सदर अतिक्रमण धारक किंवा त्यांचे नातेवाईक, हस्तक किंवा समाजकंटका कडून भांडवल होवुन एखादा अनुचित प्रकार घडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची दाट शक्यता वर्तविली आहे. त्यामुळे डॉ. रामेश्वर पूरी उपविभागीय दंडाधिकारी खामगांव यांनी भारतीय नागरीक सुरक्षा संहिता चे कलम १६३ अन्वये प्रदान करण्यात केलेल्या शक्तीनुसार पोलीस स्टेशन खामगांव शहर अंतर्गत खामगांव रेल्वे स्टेशन हद्दीत सार्वजनिक शांताता व सुव्यवस्था अबाधीत राहावी या करिता दिनांक ०४/०६/२०२५ रोजी सकाळी ८.०० वाजल्यापासुन अतिक्रमण काढे पावेतो या कालावधीत पोलीस स्टेशन खामगांव शहर अंतर्गत खामगांव रेल्वे स्टेशन हद्दीत भारतीय नागरीक सुरक्षा संहिताचे कलम १६२ अन्वये जमावबंदी मनाई आदेश जारी करण्यात येत आहे. सदर प्रतिबंधात्मक आदेशामध्ये खालील बाबी प्रामुख्याने समाविष्ट आहेत. सदर आदेशाचे उल्लंघन करणा-या विरुध्द नियमानुसार कार्यवाही करण्यात येईल. सदरचे आदेश पोलीस विभागाने जाहीर करुन त्यास प्रसिध्दी करण्याचे असेही आदेशीत करीत आहे.
१. सदरचे परिसरात कोणही व्यक्ती किंवा जमाव एकत्रितरित्या प्रवेश करणार नाहीत. २. सदरचे परिसरात घोषणा देता येणार नाही. ३. सदरचे परिसरात व्यक्ती, जमाव, हस्तक, समाजकंटक अथवा अन्य व्यक्तीकडून शांतता बाधा निर्माण होईल असे कोणतेही कृत्य करता येणार नाही. ४. सदरचे परिसरात कोणत्याही अनधिकृत व्यक्तीस वाहनास प्रवेश मनाई आहे. ५. सदर परिसरातील नियुक्त केलेले अधिकारी व कर्मचारी यांना प्रवेश करण्याचे निर्बंधा पासून वगळण्यात आलेले आहेत, उपरोक्त बाबीची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी.
असेही आदेशात डॉक्टर रामेश्वर पुरी उपविभागीय अधिकारी यांनी कळविले आहे
Comments
Post a Comment