शेतकऱ्यांनो फार्मर आयडी बनवला नसेल तर लगेच बनवून घ्या!कृषी योजनांच्या लाभासाठी फार्मर आयडी अनिवार्य
शेतकऱ्यांनो फार्मर आयडी बनवला नसेल तर लगेच बनवून घ्या!
कृषी योजनांच्या लाभासाठी फार्मर आयडी अनिवार्य
खामगांव (संतोष आटोळे)
राज्य शासनाच्या कृर्णा -योजनांचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत जलद गतीने पोहोचविण्यासाठी शेतकऱ्यांचे शेतकरी ओळख क्रमांक अर्थात फार्मर आयडी १५ एप्रिलपासून अनिवार्य करण्यात आले आहे. जिल्ह्यात ५ लक्ष ७२ हजार १२८ खातेदार असून त्यापैकी ३ लक्ष ५० हजार ३०७ शेतकऱ्यांनी (६१.२३ टक्के) नोंदणी केली आहेत. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आयडी बनवून घेतले नाही त्यांनी आपल्या जवळच्या सीएससी केंद्रावर नोंदणी करुन शेतकरी ओळख क्रमांक अर्थात फार्मर
आयडी बनवून कृषी योजनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.
जिल्ह्यात एकूण खातेदारांपैकी ४ लक्ष ३४ हजार ४६८ प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेतील लाभार्थी आहेत. त्यापैकी २ लक्ष ७३ हजार २३४ खातेदारांनी शेतकरी ओळखपत्र क्रमांक काढले असून त्याची टक्केवारी ६२.८९ इतकी आहे. विविध शासकीय योजनांचा लाभघेण्यासाठी जसे कि, प्रधानमंत्री किसान सन्मान योजना, नमो
शेतकरी सन्मान योजना, प्रधानमंत्री पिक विमा योजना, नानाजी देशमुख कृषि संजीवनी, महाडीबीटी, मदत व पुनर्वसन विभागामार्फत नैसर्गिक आपत्ती करिता देण्यात येणारी मदत याकरिता १५ एप्रिल, २०२५ च्या शासन निर्णयानुसार अनिवार्य करण्यात आले आहे. अद्याप जिल्ह्यात २ लक्ष २१ हजार ८२१ शेतकऱ्यांनी शेतकरी ओळखपत्र क्रमांक बनवून घेतलेले नाहीत. असे शेतकरी शासकीय योजनेच्या लाभापासून वंचित राहण्याची शक्यता आहे.
Comments
Post a Comment