*जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी पदी भारत चौधरी यांची नियुक्ती*
*जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी पदी भारत चौधरी यांची नियुक्ती*
*नाशिक - (बबलू मिर्झा ) जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण दिव्यांग शाखेतील वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता पदावर कार्यरत असलेले भारत चौधरी यांची नाशिक जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी पदी महाराष्ट्र शासनाने नुकतीच प्रती नियुक्ती करण्यात आली आहे*
*मंत्री मंडळाच्या निर्णयानुसार दिव्यांग कल्याण विभागाची स्वतंत्र निर्मिती करण्यात आली आहे, अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली स्वतंत्र दिव्यांग मंत्रालयाची मागणी दोन वर्षांपूर्वी मंजूर करण्यात आली होती परंतु जिल्हा स्तरावर सक्षम अधिकारी नसल्याने दिव्यांगांची परवड थांबुन दिव्यांग योजनांना गती मिळावी यासाठी 5 जिल्ह्यात दिव्यांग कल्याण विभागाचे वतीने दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी पदी निवड करण्यात आली आहे, नाशिक जिल्हा सक्षमीकरण अधिकारी पदी निवड करण्यात आल्याची माहिती दिव्यांग विभागाच्या वतीने देण्यात आली, चौधरी यांच्या निवडीचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे*
Comments
Post a Comment