*पश्चिम बंगालमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराचा युवा हिंदू प्रतिष्ठानकडून निषेध*
*पश्चिम बंगालमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराचा युवा हिंदू प्रतिष्ठानकडून निषेध*
*पश्चिम बंगाल मध्ये राष्ट्रपती राजवट लावण्यात यावी -युवा हिंदू प्रतिष्ठान*
खामगाव- पश्चिम बंगालमध्ये हिंदूवर
होत असलेल्या अमानुष अत्याचार तसेच सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून केंद्र सरकारने त्वरित राष्ट्रपती शासन लावावे.अशी मागणी युवा हिंदू प्रतिष्ठाण च्या वतीने आज 21 एप्रिल रोजी मा.राष्ट्रपती यांचेकडे करण्यात आली आहे.
उपविभागीय अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,
पश्चिम बंगाल मध्ये हिंदूवर होत असलेल्या अमानुष अत्याचार व हिंसेने संपुर्ण भारतात खळबळ माजली आहे. तर मुर्शिदाबाद येथे झालेल्या अत्याचार बाबत सोशल मिडीया आणि प्रसार माध्यमातून प्रसारित झालेल्या पोस्टवरुन या हिंसाचाराची तीव्रता आणि अत्याचार बघता समस्त हिंदू धर्मियांची भावना तिव्र होत आहे. तसेच गेल्या १० वर्षापासून बांग्लादेश मधुन बंगालमध्ये काही कट्टरपंचो घुसखोरांच्या माध्यमातून आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या राजकीय पाठबळाशिवाय हे शक्य झाले नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे बंगाल मधील हिंदूची कमी होणारी संख्या बघता तेथे हिंदूचे संरक्षणासाठी राष्ट्रपतीने कटोर पाऊले उचलुन राष्ट्रपती राजवट लावून हिंदुना न्याय दयावा.यावेळी युवा हिंदू प्रतिष्ठान च्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला. अशी माहिती श्रीकांत भुसारी यांनी एका प्रसिद्धी पत्रकातून दिली आहे.
Comments
Post a Comment