*विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदेंनी घेतले ’श्रीं’चे दर्शन*
*विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदेंनी घेतले ’श्रीं’चे दर्शन*
*खामगाव :-* दि. २६ (उमाका) महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांनी आज शनिवारी संतनगरी शेगावात श्री संत गजानन महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले. सभापती प्रा. शिंदे हे शुक्रवारी रात्रीपासून शेगावात मुक्कामी होते. अमरावती येथील कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी त्यांनी सकाळी साडेसात वाजता आनंद विहार येथून गजानन महाराजांच्या मंदिरात पोचून दर्शन घेतले. यावेळी संस्थानच्या वतीने त्यांचे यथोचित स्वागत सत्कार करण्यात आले.
यावेळी बुलढाणा माजी आमदार विजयराज शिंदे, ज्ञानेश्वर साखरे, सचिन धमाल यांनी त्यांचे स्वागत सत्कार केले. यानंतर ते अमरावतीकडे रवाना झाले.
Comments
Post a Comment