राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या राष्ट्रीय अध्यक्षानी घेतली गणेशभाऊ चौकसे यांच्या कार्याची दखल...!!ओबीसी महासंघाच्या बुलढाणा जिल्हाध्यक्ष पदी केली चौकसे यांची निवड.
राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या राष्ट्रीय अध्यक्षानी घेतली गणेशभाऊ चौकसे यांच्या कार्याची दखल...!!
खामगाव (संतोष आटोळे)- राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी गणेशभाऊ चौकसे यांच्या तीस वर्षाच्या निःस्वार्थ , निडर , सामाजिक कार्याची दखल घेत त्यांची राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या बुलढाणा जिल्हा अध्यक्षपदी त्यांची निवड केली .
राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या गोवा येथे होणाऱ्या दहाव्या राष्ट्रिय अधिवेशनाविषयी पुणे येथे दिनांक 27 एप्रिल रोजी कार्यकारिणी बैठक पार पडली . या महत्त्वपूर्ण बैठकीत बुलढाणा जिल्हा अध्यक्ष म्हणुन गणेशभाऊ चौकसे तसेच बुलढाणा युवा जिल्हाध्यक्ष म्हणुन सुरज बेलोकार यांना राष्ट्रिय अध्यक्ष बबनराव तायवाडे , राष्ट्रीय महासचिव सचिन राजूरकर व राज्य संघटक विजय डवंगे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले .
.........प्रतिक्रिया.......बुलढाणा जिल्ह्यात राष्ट्रीय ओबीसी महासंघाची नविन ओळख निर्माण करील - गणेश चौकसे.
राष्ट्रिय ओबीसी महासंघाच्या कार्यकारिणीने खूप मोठा विश्वास दाखवत माझी जिल्हाध्यक्ष म्हणुन निवड केली. कार्यकारिणीच्या या विश्वासाला मी कधीही तडा न जाउ देता ओबीसीच्या प्रत्येक घटकाला न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करुन जिल्हयात राष्ट्रिय ओबीसी महासंघाची नविन ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करिल.
Comments
Post a Comment