पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याविरोधात राजकारण न करता एकजुट होवुन केंद्र सरकारच्या निर्णयाच्या पाठीशी ठामपणे उभे रहा .....माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त करुन सवधमय नागरीकांनी वाहीली मृतकांना श्रध्दांजली.

पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याविरोधात राजकारण न करता एकजुट होवुन केंद्र सरकारच्या निर्णयाच्या पाठीशी ठामपणे उभे रहा .....माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा
पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त करुन सवधमय नागरीकांनी वाहीली मृतकांना श्रध्दांजली.
खामगाव ः- जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला.या हल्ल्यामध्ये 28 भारतीय नागरीक मरण पावले तर अनेक भारतीय नागरीक जखमी झालेले आहे. केवळ भारतातुनच नव्हे तर संपुर्ण जगभरातुन या भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध होत आहे.हा हल्ला कोणत्याही जाती धर्मावर झालेला नसुन मानवतेवर झालेला भ्याड हल्ला आहे म्हणून अश्या कठीण प्रसंगी सर्वच राजकीय पक्षांनी राजकारण बाजुला ठेवुन केंद्र सरकार दहशतवाद्यांना धडा शिकविण्यासाठी जी भुमिका घेईल  त्यासाठी केंद्र सरकारच्या पाठीशी ठामपणे उभे रहावे असे आवाहन माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा
यांनी श्रध्दांजली सभेत केले. गुरुवार दि.24 एप्रिल 2025 रोजी शहर पोलीस स्टेशन समोरील राष्ट्रपिता महात्मा गांधी उद्यान येथे माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांच्या अध्यक्षतेखाली जम्मू काश्मीर मधील पहेलगाम येथे दहशतवादी हल्ल्याचा निषेध करुन मृतकांना श्रध्दांजली देण्यासाठी श्रध्दांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते त्याप्रसंगी बोलतांना त्यांनी उपरोक्त प्रतिपादन केले.
यावेळी क्षत्रिय राजपूत समाजाचे नेते विश्वपालसिंह जाधव, बहुभाषिक ब्राह्मण समाजाचे संजुभाऊ  शर्मा, अल्पसंख्यांक समाजाचे बबलू पठाण,खामगाव प्रेस क्लबचे अध्यक्ष किशोरआप्पा भोसले, वारकरी सांप्रदायाचे हभप   खोंड महाराज,  महिला काँग्रेस कमिटीच्या प्रदेश सरचिटणीस डॉ.तब्बसुम हुसैन,शहर अध्यक्षा श्रीमती सरस्वतीताई खासने,तालुका अध्यक्ष मनोज वानखडे,विदर्भ हौशी कबडड्ी असो.चे सचिव अशोकबाप्पु देशमुख आदींची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलतांना माजी
माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा म्हणाले की,केंद्रिय गृहराज्यमंत्री किरन रिजीजु यांनी कश्मीरमध्ये पर्यटकांना सुरक्षा पुरविण्यामध्ये सरकारकडुन चुक झाली असे वक्तव्य केले.त्यांचे हे वक्तव्य चिंता करण्यास भाग पाडणारे आहे. भविष्यात अशी चुक  पुन्हा होवु नये म्हणुन यासाठी भारत सरकारने कठोर पावले उचलावी व या हल्ल्यामध्ये सहभागी झालेले दहशतवादी आणि त्यांचे प्रमुख सुत्रधारांचा शोध घेवुन निष्पाप भारतीयांचे बळी घेणाऱ्या दहशतवाद्यांवर कठोर कारवाई करुन फाशीची शिक्षा द्यावी.पहलगाम येथील घटना ही अत्यंत दुखः दायक आहे. बुलढाणा जिल्हयात जातीय सलोखा अबाधित राहुन शांतता नांदावी यासाठी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवु नका,ज्यामुळे तणाव निर्माण होईल असे चुकीचे वक्तव्य करु नये असे सांगुन या अतिरेकी हल्ल्यामध्ये ज्या निष्पाप लोकांना आपले प्राण गमवावे लागले त्यांच्या प्रती शोक संवेदना व्यक्त करुन मृतकांच्या कुटुंबियांना शांती आणि शक्ती मिळावी अशी प्रार्थना केली.
यावेळी क्षत्रिय राजपुत समाजाच्या वतीने विश्वपालसिंह जाधव,अल्पसंख्यांक समाजाच्या वतीने बबलु पठान,  पत्रकार बांधवांच्या वतीने खामगाव प्रेस क्लबचे अध्यक्ष किशोरआप्पा भोसले, वारकरी सांप्रदायातर्फे हभप खोंड महाराज , बहुभाषिक ब्राम्हण सभेच्या वतीने संजुभाऊ शर्मा यांच्यासह अनेक मान्यवरांनी निष्पाप लोकांवर झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करुन संवेदना व्यक्त केल्या.
सर्वप्रथम राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळयाला माल्यार्पण करुन अभिवादन करण्यात आले. तद्नंतर पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ राष्ट्रप्रेमी नागरीकांनी हाताला काळया फिती बांधुन निषेध असो-निषेध असो पहलगाम येथे झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध असो, दहशतवाद्यांना फाशी द्या, भारत माता की जय, हम सब एक है अश जोरदार  घोषणाबाजी करुन दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला.याप्रसंगी दोन मिनीटे मौन पाळुन व  मेणबत्या पेटवुन पहलगाम येथे दहशतवादी हल्ल्यात शहिद झालेल्या मृतकांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करण्यात आली व दहशतवादी हल्ल्यामध्ये जखमी झालेले नागरीक लवकरच बरे व्हावे यासाठी सामुहिक प्रार्थना केली.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन पत्रकार प्रशांतबाप्पु देशमुख यांनी केले.
या श्रद्धांजली सभेला वंचित बहुजन आघाडीचे माजी तालुकाअध्यक्ष संघपाल जाधव,रिपब्लीकन सामाजिक संघटनेचे प्रकाश दांडगे,नितीन सुर्यवंशी,आनंदराव वानखडे,विशाल तायडे,पत्रकार ईश्वर ठाकूर, सुमित पवार, संभाजीराव टाले, खरेदी विक्री संघाचे संचालक पांडुरंग राखोंडे,एजाज देशमुख, प्रीतम माळवंदे, संतोष महातो,तुषार चंदेल,अजयसिंग ठाकूर, संजय लाहुडकार,  धनंजय वानखडे,  सुरेंद्र पवार , कृष्णा नाटेकर, अनिल चव्हाण, रवी भोवरे,  पिंटू खराडे, वैभव वानखडे, तुषार राजपूत, अस्लम पटेल, हाजी शेख  उस्मान, हाफिज साहेब, तहेसीन शहा, आबीद उलहक, मुकद्दर खान, सैय्यद इमरान, संतोष आटोळे, सत्तू शर्मा, प्रशांत शर्मा, शुभम मिश्रा,सागर पाटील, अनंता माळी,प्रमोद महाजन, बाळू टिकार यांच्यासह राष्ट्रप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Comments

Popular Posts

*नम्रता गणेशराव धोत्रे कौलखेड अकोला या लाडक्या बहिणी विरुद्ध मलकापूर पो. स्टे. ला महाराष्ट्रातून पहिली तक्रार दाखल. मलकापूर (दिव्यांग शक्ती प्रतिनिध)ी*नुकताच महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना जाहिर केली मात्र अपात्र महिलांनीही या योजनेचा लाभ घेतल्याचे दिसत आहे.अर्जदार महीला नम्रता यांनी प्रथमतः दि. ३०-०८-२०२४ रोजी योजनेचा अर्ज केला व अंतिमतः दि. ०२-०९-२०२४ रोजी त्यांचा शासनाद्वारे अर्ज मंजुर करण्यात आला आहे व त्याप्रमाणे प्रस्तुत अर्जदार हिस दरमहा १५००/- रूपये प्रमाणे निधी तिचे खात्यात प्राप्त झाला आहे. खरे म्हणजे अर्जदार नम्रता हिने खोटे व बनावटी हमीपत्राचा दस्त तयार करून त्यात खोटी व बनावटी माहित दिली व तो खरा आहे असे भासवुना जाणीव पूर्वक सदर दस्त संबंधीत अधिकाऱ्यांकडे सादर केला.त्याद्वारे शासनाची फसवणुक करून स्वतःचा गैरहक्की आर्थिक लाभ प्राप्त केला आहे.याबाबत सविस्तर असे की सदर योजने करीता पात्रता निकष असे की,ज्या महिलेच्या एकत्रीत कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २,५०,००० /- रूपयांपेक्षा अधिक आहे, ज्या कुटूंबातील सदस्य आयकर दाता आहे, ज्या कुटूंबातील व्यक्ती सरकारी कर्मचारी म्हणुन सेवानिवृत्ती नंतर सेवानिवृत्ती वेतन घेतात, ज्यांच्या कुटूंबात चारचाकी वाहन आहे किंवा ज्या कुटूंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकर पेक्षा जास्त शेतजमिन आहे अशा महिला या योजनेसाठी पात्र ठरत नाही. पात्र अर्जदार लाडक्या बहिणीला तसे हमीपत्र सुद्धा द्यावे लागते.असे निकष असताना अर्जदार लाडकी बहिण नम्रता हिने तिचे लग्नानंतरचे नावाने अर्ज केला आहे. सदर अर्जदार हिचे सासर कडील एकत्र कुटूंबाचे उत्पन्न अडीच लाख पेक्षा जास्त आहे, सदर अर्जदार हिचे सासरे सेवानिवृत्ती वेतन घेतात, त्यांचे पती दिपक चांभारे पाटील नावाने एकुण ६ एकर शेतजमिन आहे. म्हणजेच निकषाप्रमाणे पाच एकर पेक्षा जास्त शेतजमिन आहे. असे असतांना देखील व सदरची बाब पुर्णतः माहिती व जाणीवेतील असतांना देखील प्रस्तुत अर्जदार हिने खोटे हमीपत्र निष्पादीत केले व सदर हमीपत्र व त्यातील मजकुर खोटा आहे याची माहिती व जाणीव असतांना गैरहक्की आर्थिक लाभाचे दुषित हेतुने त्याचा वापर करून शासनाची फसवणुक केली आहे व स्वतःचा आर्थिक लाभ प्राप्त करून घेतला आहे.प्रस्तुत अर्जदार ही तिचे पतीपासून गेल्या पाच ते सहा वर्षापासुन विभक्त राहत आहे. त्यांचेदरम्यान अकोला येथील न्यायालयात खावटीकरीता न्यायालयीन प्रकरणे सुरू असून सदर अर्जदार हिस तिचे पतीपासून एकत्रीतरित्या दरमहा ५०,००० /- रूपये खावटी मंजुर झाल्याची देखील तक्रारीत नमूद आहे. सबब निकषास पात्र नसतांना देखील खोटी माहिती देवून व खरी माहिती लपवून सदर अर्जदार हिने योजनेचा लाभ मिळविला आहे. सदर अर्जदार हिचे माहेरचे नांव नम्रता गणेश धोत्रे आहे व सदर धोत्रे परिवारात चारचाकी वाहन आहे व त्या परिवाराचे उत्पन्न देखील अडीच लाखापेक्षा जास्त आहे. असे असतांना स्वतःचे वैवाहिकस्थितीबाबत खोटी माहिती प्रस्तुत अर्जदाराने दिली असून शासनाची फसवणुक केली आहे व स्वतःचा गैरहक्की फायदा करून घेतला आहे.सदर महिती जनमाहिती अधिकारी तथा नायब तहसिलदार, मलकापूर यांचेकडून अर्ज व त्यासोबतची कागदपत्र यांची माहिती अधिकार कायद्याअंतर्गत मागणी केली असता. अर्जदार नम्रता यांनी खोटे हमीपत्र तयार करून त्यात खोटी माहिती देऊन शासनाची फसवणुक केल्याबाबतची व स्वतःचा गैरहक्की फायदा करून घेतला असल्याचे दिसले. नम्रता यांचे सदरचे कृत्य दखलपात्र स्वरूपाचा गुन्हा असून त्याबाबत त्यांच्या विरूध्द मलकापूर पो. स्टे. ला फिर्याद श्री. राजेंद्र काजळे यांनी दिली आहे.