खामगाव जिल्हा व्हावा व शेतकऱ्यांना संपुर्ण कर्जमाफी मिळावी या प्रमुख मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी 1 मे रोजी धरणे आंदोलन
खामगाव जिल्हा व्हावा व शेतकऱ्यांना संपुर्ण कर्जमाफी मिळावी या प्रमुख मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी 1 मे रोजी धरणे आंदोलन
धरणे आंदोलनामध्ये स्वयंस्फुतने हजारोंच्या संख्येने सहभागी व्हावे ...माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांचे आवाहन
खामगाव ः- बुलढाणा जिल्हयाचे विभाजन करुन खामगाव जिल्हयासह स्वतंत्र लाखनवाडा तालुक्याची निर्मिती करण्यात यावी तसेच अस्मानी व सुल्तानी संकटात सापडलेल्या बळीराजाला मदतीचा हात देण्यासाठी महायुती सरकारने निवडणुकीत दिलेल्या आश्वासनाप्रमाणे संपुर्ण कर्जमाफी देवुन बळीराजाला दिलासा देण्यात यावा या प्रमुख मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी गुरुवार दि. 1 मे महाराष्ट्र दिन,जागतिक कामगार दिनी मा.उपविभागीय अधिकारी खामगाव यांचे कार्यालयासमोर टॉवर चौक येथे माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांच्या नेतृत्वाखाली सर्व पक्षीय धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे.
बुलढाणा जिल्हा भौगोलिक दृष्टया खुप मोठा असल्यामुळे घाटाखालील लोकांना सोयीचे होण्यासाठी बुलढाणा जिल्हयाचे विभाजन करुन खामगाव जिल्हयासह स्वतंत्र लाखनवाडा तालुक्याची निर्मिती करण्यात यावी ही जनतेची अनेक वर्षापासुनची जिव्हाळयाची मागणी आहे. या मागणीसाठी आजपर्यंत अनेक आंदोलने झाली तरी देखील अद्यापपर्यंत खामगाव जिल्हा झालेला नाही.सन 2014 साली पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे प्रचार सभेसाठी खामगाव येथे आले असता त्यांनी खामगावकरांना साद घालत खामगाव जिल्हा होईल असे संकेत दिले होते. परंतू अद्यापपर्यंत खामगाव जिल्हा झालेला नाही. मागील 25 वर्षापासुन खामगाव जिल्हा निर्मितीचा प्रस्ताव शासन दरबारी प्रलंबित आहे. जर खामगाव जिल्हा झाला तर यामुळे जनतेचा फायदा होईल.म्हणून छोटे कुटुंब-सुखी कुटुंब या उक्तीप्रमाणे बुलढाणा जिल्हयाचे विभाजन करुन खामगाव जिल्हयासह स्वतंत्र लाखनवाडा तालुक्याची निर्मिती करण्यात यावी तसेच विधानसभा निवडणुकी दरम्यान राज्यातील महायुती सरकारने शेतकरी बांधवांना संपुर्ण
कर्जमाफी देवु असे आपल्या वचननाम्यामध्ये आश्वासन दिले होते. सध्या राज्यात निसर्गाच्या लहरीपणामुळे जगाचा पोशिंदा शेतकरी अडचणीत सापडला आहे. शेतमालाला हमी भाव मिळत नसल्यामुळे शेतकरी अधिक कर्जबाजारी होत चालला असुन राज्यात शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरुच आहे. अश्या परिस्थितीमध्ये राज्य सरकारने शेतकऱ्यांना संपुर्ण कर्जमाफी देवुन दिलासा द्यावा या प्रमुख मागण्यांसह शेतकऱ्यांच्या इतर रास्त मागण्यांकडेे शासनाचे लक्ष वेध्ाण्यासाठी गुरुवार दि.1 मे 2025 रोजी सकाळी 9 वाजता खामगाव कृषी उत्पन्न बाजार समिती येथुन शेतकरी बांधव व नागरीकांसह मोर्चा काढुन टिळक पुतळामार्गे,भारत कटपीस स्टोअर्स समोरुन, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळयाजवळुन,राष्ट्रपिता महात्मा गांधी उद्यानासमोरुन,टॉवर चौक येथे पोहचुन मा.उपविभागीय अधिकारी खामगाव यांचे
कार्यालयासमोर सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत हे धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.तसेच याप्रसंगी जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे दहशतवाद्यांकडुन निष्पाप भारतीयांवर गोळीबार करण्यात आला त्यामध्ये 28 भारतीय पर्यटकांचा मृत्यू झाला.दहशतवाद्यांकडुन झालेल्या या भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध करुन हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या निष्पाप व्यक्तींना श्रध्दांजली वाहण्यात येणार आहे.तरी या धरणे आंदोलनामध्ये शेतकरी बांधवांसह खामगाव शहर व परिसरातील नागरीकांनी पक्षभेद विसरुन मोठया संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी केले आहे.
1 मे महाराष्ट्र दिन,जागतिक कामगार दिन व विकासमहष माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून दरवष विविध विधायक कार्यक्रमांचे आयोजन करुन लोकोपयोगी कार्यक्रम राबवुन राणाजींचा वाढदिवस साजरा करण्यात येत असतो.मागील 30 वर्षापासुन जनसेवेचा हा उपक्रम निरंतरपणे सुरु आहे.याहीवष माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांच्या वाढदिवसानिमित्त विविध विधायक उपक्रम राबविण्यासाठी नियोजन करण्यात आले होते. परंतू दि.22 एप्रिल 2025 रोजी जम्मु काश्मीरमधील पहलगाम येथे निष्पाप भारतीय नागरीकांवर दहशतवाद्यांनी क्रुर हल्ला केला. यामध्ये 28 भारतीय नागरीक मृत्युमुखी पडले.ही दुःखद घटना घडल्यामुळे यावष 1 मे रोजी माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांच्या वाढदिवसानिमित्त होणारे कार्यक्रम रदद् करण्यात आले आहे.त्यामुळे माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांच्या वाढदिवशी कार्यकर्त्यांनी सत्कारासाइी हार,तुरे,शाल,श्रीफळ न आणता सत्कारासाठी होणाऱ्या खर्चाच्या रकमेतुन सामाजिक व लोकोपयोगी कामांना प्राधान्य द्यावे व त्या दृष्टीने नियोजन करावे आणि 1 मे रोजी आयोजित धरणे आंदोलन व सायंकाळी 5 वाजता सामान्य रुग्णालय येथे आयोजित रुग्णांना फळवाटप, शरबत वितरण व अपंगांना तीन चाकी सायकल वाटप या कार्यक्रमांना मोठया संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन सानंदा मित्र मंडळ,राणा फाऊंडेशनच्या,सीएम हेल्थ क्लब,राणा व्यायाम मंदिर यांच्यासह शक्तीउपासक मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
Comments
Post a Comment