*दिव्यांगांचे ऑफिस खालच्या मजल्यावर हलविण्याबाबत निवेदन
नांदुरा (सुरेश खानचंदानी)
नांदुरा नगरपरिषद कार्यालयातील दिव्यांगांसाठी असलेले ऑफिस वरच्या मजल्यावर असल्याने त्यांना वर-खाली ये-जा करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. दिव्यांग व्यक्तींसाठी सुलभ आणि सोयीस्कर अशी व्यवस्था व्हावी,
यासाठी सरकारचं सुसूत्र धोरण असताना या नगरपालिकेमध्ये असलेले वरच्या मजल्यावरील दिव्यांगांचे ऑफिस खालच्या मजल्यावर हलविण्यात यावे, अश्या मागणीचे निवेदन अमोल करुटले यांनी दिले
खाली मजल्यावर कार्यालय आल्याने
दिव्यांग व्यक्तींसाठी हे एक महत्त्वाचे पाऊल ठरेल. त्यांच्या दैनंदिन कार्यप्रक्रियेत सुलभता येऊन ते अधिक सहजतेने काम करू शकतील. कृपया वरील निवेदनाची दखल घेऊन लवकरात लवकर योग्य ती कार्यवाही करावी.
अश्या मागणीचे निवेदन
अमोल अरुण करुटले यांनी दिले आहे
Comments
Post a Comment