*सुमित डफडे यांची अन्नसुरक्षा अधिकारीपदी निवड प्रा. डॉ. पुरुषोत्तम धोंडगे यांनी केला गौरव*
सुमित डफडे यांची अन्नसुरक्षा अधिकारीपदी निवड
कंधार (राहुल गीते)
तालुक्यातील शेकापूर येथील माजी ग्रा.पं. सदस्य तथा माजी तंटामुक्ती अध्यक्ष राजू पा. डफडे यांचे चिरंजीव सुमित डफडे यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले असून त्यांची अन्नसुरक्षा अधिकारीपदी निवड झाली आहे. यानिमित्त श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष प्रा. डॉ. पुरुषोत्तम धोंडगे यांच्याकडून सुमित डफडे यांचा गौरव करण्यात आला.
संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीदिनी शनिवारी क्रंतिभुवन बहाद्दरपुरा येथील दिवंगत डॉ. भाई केशव धोंडगे यांच्या समाधीस्थळी प्रा. डॉ. पुरुषोत्तम धोंडगे यांनी सुमित डफडे यांचा मन्याडखोरी पद्धतीने
खोबऱ्याचा हार देऊन गौरव केला. सुमितचे वडील राजू पाटील डफडे हे पुरुषोत्तम धोंडगे यांचे निकटवर्तीय असून कार्यकर्त्याच्या मुलांने मिळवलेले यश हे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी प्रोत्साहन ठरावे हे प्रा. पुरुषोत्तम धोंडगे यांनी सुमित डफडेच्या सत्करातून दाखवून दिले आहे.
यावेळी प्रा. डॉ. पुरुषोत्तम धोंडगे यांनी राजू पा. डफडे यांनी आपल्या मुलावर केलेल्या संस्काराचे कौतुक केले. शेतकरी, कुणब्यांचे लेकरू मोठ्या पदावर गेल्यानंतर त्यांचा सन्मान करणे तुम्हा आम्हा सर्वांचं कर्तव्य आहे. सुमितला मिळालेले पद , त्यांनी ठरवलेलं ध्येय,त्यांची इच्छाशक्ती,त्यांनी केलेली मेहनत याचे फलित आहे. या पदावर गेल्यावर नंतर आपण शेतकऱ्यांचे, बहुजनांचे ,गोरगरिबांच्या हिताची कामे करावीत जेणेकरून आमच्या भागातल्या या अधिकाऱ्याचं नाव एक कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून संबंध महाराष्ट्राने घ्यावं अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
सत्काराला उत्तर देताना सुमित डफडे म्हणाले की, डॉ. भाई केशवराव धोंडगे यांनी ज्ञानाची गंगोत्री ग्रामीण भागात आणली त्या ज्ञानगंगेचा फायदा मला झाला. मला ज्ञान मिळाले आणि मी यशस्वी झालो असे म्हणत त्यांनी प्रा. डॉ. पुरुषोत्तम धोंडगे यांचे आभार मानले. यावेळी मारुती पा. कळकेकर,नागेश पा.वडवळे जनार्दन तिडके, शाहीर प्रेम कुमार मस्के,भगवान पा.सुरनर,नवनाथ पा.जाधव, तिरुपती पा.मोरे,गोविंदराव पा. मोरे ,महंमद पठाण,
जाफर खानसाब, माधव पा. घोरबांड, उद्धव पा. लाडेकर,आत्माराम पा. लाडेकर, केशव पा.लाडेकर,दयानंद पा. घोरबांड, मुस्तफा पठाण ,केरबा केंद्रे,वसंतराव निलावाड,इरबाजी जायभाये, पंडित देवकांबळे, श्रीहरी कल्याणकर, बालाजी कल्याणकर ,केशव पा.कल्याणकर,बालाजी पा.कदम,भगवान वरपडे,राम घोरबांड, बालाजी कदम,भगवानराव वरपडे,उत्तमराव भांगे गुरुनाथ पेठकर, श्याम तेलंग, श्याम लुंगारे आदी उपस्थित होते.
Comments
Post a Comment