अवधा येथे आज हिमोग्लोबिन थायराइड सिकलसेल कॅल्शियम आणि एचआयव्ही तपासणी शिबीर
अवधा येथे आज हिमोग्लोबिन थायराइड सिकलसेल कॅल्शियम आणि एचआयव्ही तपासणी शिबीर .... नांदुरा (वि प्र.सोपान पाटील ) नांदुरा तालुक्यातील अवधा खुर्द येथील जि. प.शाळा येथे थायराइड,कॅल्शियम सिकलसेल,एच आय व्ही ची चाचणी करण्यात आली. चाचणी वयोगट 18 ते 40 पर्यंत करण्यात आली. नांदुरा पि एच सी चे लॅब टेक्निशियन सतीश डामरे सर, संदीप गोंड सर, मिलिंद गुरचळ सर, सौ.गीताताई माटे मॅडम हे सर्व उपस्थित होते. या शिबिराला गावातील लोकांचे खूप सहकार्य लाभले.या कार्यक्रमला सोपान पाटील का. संपादक दै. रायगड स्वाभिमान, प्रल्हाद सोळंके पोलीस पाटील,सुनील डाबेराव, विठ्ठल उन्हाळे, मोहन ढोले, अंगणवाडी सेविका सौ.ढोले ताई, आशा सौ.उन्हाळे ताई व इतर सर्व गावकरी यांनी या शिबिराचा लाभ घेतला
Comments
Post a Comment