खामगाव रत्न कॉ. गोविंद पुरोहित यांना रविवारी सर्वपक्षीय श्रध्दांजली
खामगाव रत्न कॉ. गोविंद पुरोहित यांना रविवारी सर्वपक्षीय श्रध्दांजली
खामगाव-भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे बुलढाणा
जिल्ह्याचे माजी सचिव कष्टकरी कामगारांचे नेते कॉ. गोविंद पुरोहीत यांचे २४ जानेवारी रोजी अकोला येथे वृध्दापकाळाने वयाचे ९३ व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य कामगार चळवळीला वाहुन दिले. गुमास्ता कामगार, जिनिंग प्रेसींग, ऑईल मील, कामगारांचा लढा उभारुन हजारो कामगारांना न्याय मिळवून दिला. त्यांच्या संघर्षमय भुमिकेमुळे त्यांना खामगाव पत्रकारिकेकडून 'खामगाव रत्न' या पुरस्काराने गौरविण्यात आले. तसेच कॉ. दत्ता देशमुख विचारमंचाद्वारे त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला होता. असे संघर्षमुती कॉ. गोविंद पुरोहित यांना २३ फेब्रुवारी रोजी होमिओपॅथीक कॉलेज सिव्हील लाईन खामगाव येथे सकाळी ११ वाजता सर्वपक्षीय श्रध्दांजलीचा कार्यक्रम ठरविण्यात आला असून जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून त्यांना श्रध्दांजली अर्पण करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
तर या महा मानवाला साप्ताहिक दिव्यांग शक्ती परिवार व विराट मल्टीपर्पज फाउंडेशन च्या वतीने श्रद्धांजली
Comments
Post a Comment