*बदलत्या काळानुरुप पोलीस खाते अद्ययावत, सुविधायुक्त असावे*- ना. ॲड आकाश फुंडकर

*बदलत्या काळानुरुप पोलीस खाते अद्ययावत, सुविधायुक्त असावे*
- ना. ॲड आकाश फुंडकर

*जलंब, पिंपळगाव राजा पोलीस स्टेशनच्या नवीन इमारतींचे भूमिपूजन*

खामगांव, दि.२२ : लोकांमध्ये शांतता आणि कायद सुव्यस्था राखण्यात पोलीसांची महत्त्वाची भूमिका असते. बदलत्या काळानुसार पोलीस खाते अद्ययावत, सर्व सुविधायुक्त असले पाहिजेत, असे प्रतिपादन कामगार मंत्री ना.ॲड.आकाश फुंडकर यांनी आज येथे केले.

खामगाव विधानसभेचे आमदार तथा राज्याचे कामगार मंत्री ना. ॲड आकाश फुंडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत जलंब आणि पिंपळगाव राजा पोलीस स्टेशनच्या नवीन इमारत बांधकामाचे भूमिपूजन व कोनशिलेचे अनावरण करण्यात आले. त्यावेळी ना.ॲड फुंडकर बोलत होते. या कार्यक्रमात अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रामनाथ पोकळे, पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, पोलीस उप अधीक्षक कारखेडे, तहसिलदार दिपक बाजड आदी अधिकारी व पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

ना.ॲड आकाश फुंडकर म्हणाले, जीवाची पर्वा न करता काम करणाऱ्या पोलीसांना हक्काचे कार्यालय असावे यादृष्टीने गेल्या तीन-चार वर्षांपासून प्रयत्न करत होतो. जिल्ह्यातील हिवरखेड, जलंब, पिंपळगाव राजा, खामगाव ग्रामीण, पोलीस उप अधीक्षक, अतिरिक्त पोलीस अधीक्षक कार्यालय इमारतींची मागणी केली आहे. लवकरच कार्यादेश आणण्याचा प्रयत्न आहे. शासनाकडून पोलीसांना सुविधा दिल्या जात आहेत. त्याप्रमाणे पोलीसांकडूनही लोकांना सर्व सोयीसुविधा मिळाल्या पाहिजेत,असे निर्देश त्यांनी दिले.

*लोकांना मदतीचा हात द्या !*

जलंब, पिंपळगाव राजा पोलीस स्टेशनची प्रशस्त इमारत लोकांच्या सेवेत लवकरच रुजू होईल आणि लोकांवरील अन्याय दूर करून त्यांना मदतीचा हात देत पोलीस विभाग परिसरात चांगले वातावरण निर्माण करेल, असा विश्वास मंत्री ना.ॲड.आकाश फुंडकर यांनी व्यक्त केला.

*पोलीस गृहसंकुलासाठी प्रयत्नशील*
विधानसभा आचारसंहितेमुळे थांबलेल्या पोलीस गृहसंकुलाच्या प्रस्तावांना मान्यता मिळण्यासाठी प्रयत्नरत आहे. सर्व प्रस्ताव पोलीस महासंचालक यांच्याकडे पाठविण्यात आले आहेत. पोलीस गृहसंकुलाचे सर्व प्रस्तावांना तात्काळ मंजूरी मिळविण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे मंत्री ॲड.आकाश फुंडकर यांनी यावेळी सांगितले.

स्वातंत्र्यपूर्व आणि आत्ताच्या पोलीसांच्या कार्यपद्धतीत मोठे बदल झाले आहे. माहिती तंत्रज्ञानामुळे पोलीस प्रशासनात वेगवेगळ्या शाखा स्थापन झाल्या आहेत. जुन्या पोलीस स्टेशनची जागा  अपुरी पडत होती. परिणामी लोकांना उभे राहावे लागत होते. त्यामुळे लोकांना चांगल्या सुविधा देण्यासाठी या नवीन इमारतीमध्ये विविध शाखा, सीसीटिएनएस अंतर्गत ॲानलाईन एफआयआर सुविधा, ॲम्बीश प्रणाली, सीसीटिव्ही यंत्रणा शासनाच्यावतीने सुरु करण्यात येईल. जिल्ह्यातील ३३ पैकी आठ पोलीस स्टेशनच्या नवीन इमारती झाल्यात आहेत. मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्या सात कलमी कृती आराखड्यांतर्गत आज दोन इमारतींचे भूमिपूजन झाले असून तीन इमारतीचे कार्यादेश झाले आहेत. येत्या काळात हे पोलीस स्टेशन नव्या रुपात जनतेच्या सेवेत येत असल्याचे मनोगत विशेष पोलीस महानिरीक्षक रामनाथ पोकळे यांनी व्यक्त केले.  

जलंब आणि पिंपळगाव राजा पोलीस स्टेशनच्या नवीन इमारत बांधकामासाठी ना.ॲड आकाश फुंडकर यांनी २० कोटींचा निधी आणला आहे. त्यांच्या प्रयत्नाने पिंपळगाव राजा, जलंब, मेहकर आणि जळगांव जामोद येथे नवीन पोलीस स्टेशन इमारत बांधकाम मंजूर झालेले आहे. जलंब पोलीस स्टेशनची इमारत ही १९१७ सालच्या स्वातंत्र्यपूर्व काळातील असून ती जीर्ण झाली असल्याची दखल घेत ना. फुंडकर यांनी नवीन इमारतीसाठी पाठपुरावा केला आहे. जलंब पोलीस स्टेशनचा परिसर एकूण १३,४०० चौ.मीटरचा आहे. या नवीन इमारतीमध्ये ४५० चौ.मी क्षेत्रात तळ मजला आणि तेवढ्याच क्षेत्रात पहिला मजला असे इमारतीचे बांधकाम होणार असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक अमोल सांगळे यांनी प्रास्ताविकात दिली.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनिष देशमुख तर आभार प्रदर्शन पिंपळगाव राजा पोलिस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक  गुजर यांनी केले.
००००

Comments

Popular Posts

*नम्रता गणेशराव धोत्रे कौलखेड अकोला या लाडक्या बहिणी विरुद्ध मलकापूर पो. स्टे. ला महाराष्ट्रातून पहिली तक्रार दाखल. मलकापूर (दिव्यांग शक्ती प्रतिनिध)ी*नुकताच महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना जाहिर केली मात्र अपात्र महिलांनीही या योजनेचा लाभ घेतल्याचे दिसत आहे.अर्जदार महीला नम्रता यांनी प्रथमतः दि. ३०-०८-२०२४ रोजी योजनेचा अर्ज केला व अंतिमतः दि. ०२-०९-२०२४ रोजी त्यांचा शासनाद्वारे अर्ज मंजुर करण्यात आला आहे व त्याप्रमाणे प्रस्तुत अर्जदार हिस दरमहा १५००/- रूपये प्रमाणे निधी तिचे खात्यात प्राप्त झाला आहे. खरे म्हणजे अर्जदार नम्रता हिने खोटे व बनावटी हमीपत्राचा दस्त तयार करून त्यात खोटी व बनावटी माहित दिली व तो खरा आहे असे भासवुना जाणीव पूर्वक सदर दस्त संबंधीत अधिकाऱ्यांकडे सादर केला.त्याद्वारे शासनाची फसवणुक करून स्वतःचा गैरहक्की आर्थिक लाभ प्राप्त केला आहे.याबाबत सविस्तर असे की सदर योजने करीता पात्रता निकष असे की,ज्या महिलेच्या एकत्रीत कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २,५०,००० /- रूपयांपेक्षा अधिक आहे, ज्या कुटूंबातील सदस्य आयकर दाता आहे, ज्या कुटूंबातील व्यक्ती सरकारी कर्मचारी म्हणुन सेवानिवृत्ती नंतर सेवानिवृत्ती वेतन घेतात, ज्यांच्या कुटूंबात चारचाकी वाहन आहे किंवा ज्या कुटूंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकर पेक्षा जास्त शेतजमिन आहे अशा महिला या योजनेसाठी पात्र ठरत नाही. पात्र अर्जदार लाडक्या बहिणीला तसे हमीपत्र सुद्धा द्यावे लागते.असे निकष असताना अर्जदार लाडकी बहिण नम्रता हिने तिचे लग्नानंतरचे नावाने अर्ज केला आहे. सदर अर्जदार हिचे सासर कडील एकत्र कुटूंबाचे उत्पन्न अडीच लाख पेक्षा जास्त आहे, सदर अर्जदार हिचे सासरे सेवानिवृत्ती वेतन घेतात, त्यांचे पती दिपक चांभारे पाटील नावाने एकुण ६ एकर शेतजमिन आहे. म्हणजेच निकषाप्रमाणे पाच एकर पेक्षा जास्त शेतजमिन आहे. असे असतांना देखील व सदरची बाब पुर्णतः माहिती व जाणीवेतील असतांना देखील प्रस्तुत अर्जदार हिने खोटे हमीपत्र निष्पादीत केले व सदर हमीपत्र व त्यातील मजकुर खोटा आहे याची माहिती व जाणीव असतांना गैरहक्की आर्थिक लाभाचे दुषित हेतुने त्याचा वापर करून शासनाची फसवणुक केली आहे व स्वतःचा आर्थिक लाभ प्राप्त करून घेतला आहे.प्रस्तुत अर्जदार ही तिचे पतीपासून गेल्या पाच ते सहा वर्षापासुन विभक्त राहत आहे. त्यांचेदरम्यान अकोला येथील न्यायालयात खावटीकरीता न्यायालयीन प्रकरणे सुरू असून सदर अर्जदार हिस तिचे पतीपासून एकत्रीतरित्या दरमहा ५०,००० /- रूपये खावटी मंजुर झाल्याची देखील तक्रारीत नमूद आहे. सबब निकषास पात्र नसतांना देखील खोटी माहिती देवून व खरी माहिती लपवून सदर अर्जदार हिने योजनेचा लाभ मिळविला आहे. सदर अर्जदार हिचे माहेरचे नांव नम्रता गणेश धोत्रे आहे व सदर धोत्रे परिवारात चारचाकी वाहन आहे व त्या परिवाराचे उत्पन्न देखील अडीच लाखापेक्षा जास्त आहे. असे असतांना स्वतःचे वैवाहिकस्थितीबाबत खोटी माहिती प्रस्तुत अर्जदाराने दिली असून शासनाची फसवणुक केली आहे व स्वतःचा गैरहक्की फायदा करून घेतला आहे.सदर महिती जनमाहिती अधिकारी तथा नायब तहसिलदार, मलकापूर यांचेकडून अर्ज व त्यासोबतची कागदपत्र यांची माहिती अधिकार कायद्याअंतर्गत मागणी केली असता. अर्जदार नम्रता यांनी खोटे हमीपत्र तयार करून त्यात खोटी माहिती देऊन शासनाची फसवणुक केल्याबाबतची व स्वतःचा गैरहक्की फायदा करून घेतला असल्याचे दिसले. नम्रता यांचे सदरचे कृत्य दखलपात्र स्वरूपाचा गुन्हा असून त्याबाबत त्यांच्या विरूध्द मलकापूर पो. स्टे. ला फिर्याद श्री. राजेंद्र काजळे यांनी दिली आहे.