*सरपंच ताई यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक**जयरामगड येथे एतीहासीक ५१ लाभार्थ्यांना घरकुल मंजुरी पत्र वितरण
*सरपंच ताई यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक*
*जयरामगड:-* (शेखर तायडे)येथे इतिहासात प्रथमच एकत्रित एकूण ५१ घरकुल गरजू लाभार्थ्यांना मंजूर झाल्याने परिसरामध्ये सरपंच ताई यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
केंद्र सरकारने प्रधानमंत्री आवास योजनेत महाराष्ट्रासाठी २० लाख नवीन घरे मंजूर केली आहे. दरम्यान जयरामगड येथे प्रधानमंत्री आवास योजनेचे ५१ लाभार्थ्यांना घरकुलांचे मंजूरी पत्र वितरण करण्यात आले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात २ महिन्यांपूर्वी केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या प्रयत्नाने केंद्र सरकारने प्रधानमंत्री आवास योजनेत महाराष्ट्रासाठी २० लाख नवीन घरे मंजूर केली होती. केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांच्यासमवेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २२ फेब्रुवारी रोजी पुणे येथे महाआवास अभियान २०२४-२५ ग्रामीण टप्पा-२ मधील घरकुल मंजूर झालेल्या २० लाख लाभाथ्यापैकी ५ लाभर्थ्यांना प्रातिनिधिक स्वरुपात अमित शाह यांचे हस्ते मंजुरी पत्राचे वाटप केले.
तसेच जयरामगड जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळा येथे या कार्यक्रमाचे लाईव्ह प्रक्षेपण लाभार्थ्यांना दाखवण्यात आले.जयरामगड येथे नव्याने प्रधानमंत्री आवास योजनेचे ५१ लाभार्थ्यांना मंजूरी पत्र वाटप करण्यात आले.लाभार्थ्याचे पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रामपंचायत कर्मचारी नितेश वानखडे यांनी केले.ग्रामपंचायत अधिकारी अंभोरे सर यांनी
प्रास्ताविक केले तर रोजगार सेवक गजानन बंड यांनी आभार प्रदर्शन केले.प्रसंगी गावच्या प्रथम नागरिक सौ.वानिताताई सुनिल जाधव,ग्रा. पं.सर्व सदस्या, तंटामुक्ती अध्यक्ष भिकाजी अढाव, संगणक परिचालक राम राठोड व गावातील शेकडो महिला, पुरूष व लाभार्थी तसेच इतर नागरिक उपस्थित होते.
Comments
Post a Comment