महाशिवरात्री निमीत्त श्री नवयुवक मानाची कावड यात्रा वतीने भव्य शोभायात्रेचे आयोजन
महाशिवरात्री निमीत्त श्री नवयुवक मानाची कावड यात्रा वतीने भव्य शोभायात्रेचे आयोजन
खामगांव :-( संतोष आटोळे ) बुलढाणा जिल्ह्यातील ऐतिहासीक श्री नवयुवक मानाची कावड यात्रा वतीने मंडळाचे संस्थापक अध्यक्ष राहुलभाऊ कळमकार यांच्या नेतृत्वाखाली महाशिवरात्रीचे पवित्र दिनी दरवर्षी प्रमाणे यंदाही भव्य शोभायात्रेचे आयोजन दि. २६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी करण्यात आले आहे.
विशेष म्हणजे यावर्षी शोभायात्रा हि महिलांचे नेतृत्वाखाली निघणार असून या शोभायात्रेत हजारो महिला भगीनी सहभागी होणार आहेत.
दि. २५ फेब्रुवारी रोजी श्री नवयुवक मानाची कावड यात्रा मंडळाचे वतीने तिथक्षेत्र नागझरी येथून पवित्र जल आणण्यात येणार आहे आणि महाशिवरात्रीचे दिवशी शहरातील पाच मुख्य श्री महादेव मंदिरात जलाभिषेक करण्यात येणार आहे. शोभायात्रा सायंकाळी ६ वाजता निघणार असून तत्पुर्वी दुपारी ३ ते ६ दरम्यान राठी प्लॉट, दाल फैल भागातील शिव मंदिरात फराळ व दुध वाटप करण्यात येणार आहे.
सायंकाळी ६ वाजता केंद्रिय मंत्री ना. प्रतापरावजी जाधव व राज्याचे कामगार मंत्री ना. अॅड. आकाशदादा फुंडकर, हिंदु नेता अमोलभाऊ अंधारे, माजी नगरसेवक राकेशभाऊ राणा यांचे हस्ते महाआरती करण्यात येणार असून त्यानंतर शोभायात्रेला सुरूवात होईल. शोभायात्रेत श्री भगवान शंकर आणि पार्वतीमाता यांचा जीवंत देखावा देखील सादर केल्या जाणार आहे.
महाशिवरात्री उत्सवाकरीता ह.भ.प. सुलोचनाताई सुलताने यांचे मार्गदर्शनाखाली महिलांची कार्यकारिणी तयार करण्यात आली असून अध्यक्ष सौ. राधा खेडकर, उपाध्यक्ष सौ. अंकिता कळमकार व संगीता शिराळ, सचिव सौ. दुर्गा पर्वते, सहसचिव प्राची खोपाले, सल्लागार - कु. कविता इंगळे, कोषाध्यक्ष सौ. अलका मोरे, सदस्य सौ. छाया भावसार, सौ. सपना खेडकर, श्रीमती प्रमिला मोरे, प्रमुख व्यक्ती सौ. नेहा खुळे यांचा समावेश आहे.
सदर शोभायात्रा सायंकाळी ६ वाजता राठी प्लॉट, दाल फैल भागातून निघणार असून वऱ्हाडे चौक, राणा गेट, फरशी, सुटाळपुरा, महाकाल चौक, मुक्तीधाम स्मशानभुमी येथे महापुजा करून शोभायात्रेचा समारोप होणार आहे.
Comments
Post a Comment