प्रहार अपंग क्रांती संघटना जळगांव जिल्हा उपाध्यक्ष पदी ललिता पाटील यांची निवड
प्रहार अपंग क्रांती संघटना जळगांव जिल्हा उपाध्यक्ष पदी ललिता पाटील यांची निवड
जळगाव (प्रवीण पाटील)
प्रहार संघटना संस्थापक अध्यक्ष तसेच माजी राज्य मंत्री तथा बच्चूभाऊ कडू यांच्या विचारांनी नेहमीच प्रहार अपंग क्रांती संघटना जळगांव जिल्हयात गोर गरीब अनाथ अपंग परित्कत्या शेतकरी ह्यांच्या हितासाठी काम करत असते सर्व सामान्य जनतेच्या समस्या ना वाचा फोडण्याचे काम प्रहार अपंग क्रांती संघटने कडून नेहमी पुढाकार घेऊन काम करत असते पारोळा तालुक्यातील मंगरूळ येथील रहिवासी व प्रहार अपंग क्रांती संघटना पारोळा तालुका अध्यक्ष ललिता शांताराम पाटील यांच्या कामाची दखल घेत जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब पाटील यांनी एरंडोल विश्राम गृह येथे आज प्रहार संघटनेची आढावा बैठक घेते वेळी ललिता पाटील यांची जळगांव जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड केली ह्या वेळी नियुक्ती पत्र देत त्यांचा सत्कार करण्यात आला.ह्या वेळी प्रहार संघटनेचे जळगांव जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब पाटील. बाहदरपुर शाखेचे अध्यक्ष पंकज पाटील वसंतनगर शाखेचे अध्यक्ष रोहित जाधव प्रहार संघटनेचे हेमंत पाटील व प्रहार संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ललिता पाटील संघटनेचे पदाधिकारी यांचे आभार मानले
Comments
Post a Comment