, भारतीय राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन संघ (नाफेड) यांना किसान सभेचे निवेदन
, भारतीय राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन संघ (नाफेड) महाराष्ट्र राज्य यांना किसान सभेचे निवेदन
खामगाव
( संतोष आटोळे)
भारतीय राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन संघ (नाफेड) महाराष्ट्र राज्य, यांना उपविभागीय अधिकारी उपविभागीय कार्यालय, खामगाव यांना हमीभावाने सोयाबीन खरेदी करणे बाबत निवेदन सादर करण्यात आले केंद्र सरकारने हमीभावाने सोयाबीन खरेदी करणार असल्याचे जाहीर करून खरेदी सुरु केली आहे या खरेदीची मुदत वाढ ही फेब्रुवारी 2025 घोषित करण्यात आली होती परंतु खरेदीच्या प्रक्रियेमध्ये होणारा विलंब, शेतकऱ्यांची एकाच वेळी झालेली गर्दी आणि काही तांत्रिक कारणामुळे शेतकऱ्यांना आपले सोयाबीन पणन विभागाला विकता आले नाही. त्यामुळे 6 फेब्रुवारी ही मुदलवाढ निघून गेली शेतक्र्यांची ही समस्या लक्षात घेऊन सरकारने महाराष्ट्र व तेलंगणा राज्यासाठी मुदतवाढ जाहीर केली. मुदत वाढीचे कोणताही निर्णय व पत्र आम्हाला प्राप्त झाले नसल्याचे सांगत पणन विभागाने सोयाबीन खरेदी बंद केली आहे. शेतकन्यांच्या अत्यत गामीर प्रश्न बाबत सरकारची असंवेदनशीलता दिसत असून सरकार आणि प्रशासनामध्ये समन्वय नसल्याचेही निदर्शनास लाखो शेतकन्यांकड़े आजही धरात सोयाबीन साठवलेले आहे. सोयाबीनचा भाव वाटेल आणि सरकार वाढीव हमीभावाने सोयाबीन खरेदी करेल या आबड्या आशेपोटी शेतकयांनी सोयाबीन साठवून ठेवले. सराकारले सोयाबीनच्या हमीभावामध्ये मात्र कुवलीही बाढ़ तर केलेली नाही परंतु व्यापाराच्या दबावाखाली हमी भावाने सोयाबीन खरेती थाबवली आहे. बहुमतात असलेले केंद्रातील भाजपा सरकार हुकूमशाही पद्धतीने कारभार चालवत आहे. सरकारच्या शेतकरी विरोधी आणि भांडवलदार धार्जीने धोरणामुळे आधीच शेतकरी आर्थिक दुष्टचक्रात अडकानेला असताना आता हमीभावाने सोयाबीन खरेदी थांबवल्यामुळे शेतकर्यांच्या अडचणीत वाढ होणार आहे. सरकार जर सोयाबीन खरेदी करणार नसेन तर कवडीमोल भावाने व्यापारी अडत्याना आपले सोयाबीन शेतकऱ्यांनी विकायचे का? केंद्र सरकारने सोयाबीन खरेदीसाठी दिलेली 24 दिवसाच्या मुदत बाढीचा खुलासा पनन विभाग कार्यालयाने मागवावा आणि त्वरित शेतक-यांचे सोयाबीन खरेदी करावे, खरेदी प्रक्रिया थांबवू नये केंद्रीय कृषिमंत्र्यांनी जाहीर केलेल्या मुदत वाढीचे त्वरित आदेश विभागाला दयावे सरकार शेतकर्यांच्या भावनेशी खेळत असेल आणि सोयाबीन खरेदी सुरु करणार नसेल तर अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात येत आहे. यावेळी कॉम्रेड जितेंद्र चोपडे जिल्हाध्यक्ष भारतीय किसान सभा खामगाव बुलडाणा जिल्हा कॉग्रेड विप्लव कविश्वर भारमानी कॉमेड महेश ताकतकर, कॉमेड सुनील चौपड़े. कॉमेड प्रकाश पलाई अमोल पाटील केवलविंग राजपूत भीमेड संजय वाकुडकर,आदी यावेळी हजर होते
Comments
Post a Comment