प्रा मोहम्मद फारुक राष्ट्रसंत गाडगेबाबा राज्यस्तरीय समाज भूषण 2025 पुरस्कारा ने सन्मानित
खामगाव :- पहाट फाउंडेशन संभाजी नगर च्या माध्यमातून राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त राज्यस्तरीय ग्रामविकास परिषदेचे आयोजन व राज्यस्तरीय पुरस्कार वितरण शेगाव येथे करण्यात आले याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार प्रा मोहम्मद फारुक यांना राज्यस्तरीय समाजभूषण 2025 पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले तसेच यावेळी महाराष्ट्र भरातील विविध क्षेत्रात विशेष काम करणाऱ्याना राष्ट्रसंत गाडगेबाबा राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचेउदघाटन मिसेस इंडिया श्वेता परदेशी यांच्या हस्ते झाले याप्रसंगी पाटोदा ग्राम पंचायत के सरपंच भास्कर पेरे पाटिल , ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते भाऊ भोजने, डॉ.संजय गायकवाड, प्रा.रमेश गावित, पहाट फाउंडेशन च्या संचालिका अर्पिता सुरडकर, संचालक अमोल भिलंगे मंचावर विराजमान होते.
कार्यक्रमाचे दुसऱ्या सत्रात भास्कर पेरे पाटील यांनी सांगितले की गावाच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र आल्याशिवाय पर्याय नाही ते पुढे म्हणाले की अशक्य कुठलीच गोष्ट नाही फक्त प्रयत्न हे योग्य दिशेने व्हायला पाहिजेत गावाच्या विकास करताना सर्व गावकऱ्यांना एकत्र करून विकासाची आखणी करणे गरजेचे आहे
दिवसभराच्या परिषेदेत एकूण पाच चर्चासत्र होते.त्यामध्ये शाश्वत ग्रामीण विकास आणि लोकांचा सहभाग, ग्रामीण विकासासाठी महिलांचा सहभाग, वातावरण बदलाचा होणारे परिणाम इत्यादी विषयांवर विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केलेत. त्यामध्ये कृषी अधिकारी अमोल बनसोडे,अभयसिंग मारोडे, वैशाली चोपडे, सुवर्णा टापरे, विद्या सुमित डोसे , उदयकुमार पगाडे आदींनी सहभाग नोंदविला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आरती गवते व वैशाली भिलंगे यांनी केले. तर पहाट फाउंडेशन चे संचालक सोमनाथ चौधरी, रिक्लेमा वळवी, पल्लवी धांडे, नितीन कसाब, मेघना हिवाळे, अश्विनी राठोड, महादेव लोखंडे, संतोष घुंगासे, ऍड.निवृत्ती बोरसे आदींनी कार्यक्रमासाठी विशेष परिश्रम घेतले तर आभार प्रदर्शन पहाट फाउंडेशन च्या संचालिका अर्पिता सुरडकर यांनी मानले.
Comments
Post a Comment