*विना हेल्मेट दुचाकीस्वार व पिलीयन रायडर यांच्यावर होणार कार्यवाही !*
बुलढाणा (दिव्यांग शक्ती) दोन चाकी चालवणारा व त्यामागे बसणाऱ्यावर हेल्मेट न घातल्यामुळे होणार Section 129 of MV Act 1988 अन्वये कार्यवाही!यांचेवर सुरक्षा दृष्टीकोनातून अंमलबजावणी करणेसाठी महाराष्ट्र राज्यातील मागील ०५ वर्षातील रस्ते अपघाता आढावा घेतला असता असे दिसून आल्यामुळे विना हेल्मेट दुचाकीस्वार व पिलीयन रायडर म्हणजे मागील सीटवर बसलेला यांचे अपघात, मृत्यूमुखी तसेच जखमींच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. तसेच, Section 128 आणि 129 of MV Act 1988 कायदयातील तरतुदीप्रमाणे विना हेल्मेट दुचाकीस्वार व पिलीयन रायडर यांचे सुरक्षेच्या दृष्टीकोनातून पोलीस घटकांकडून प्रभावीपणे अंमलबजावणी होत नसल्याचे दिसून येत आहे.मा. सर्वोच्च न्यायालयाच्या रस्ते सुरक्षा समितीने दिलेले उद्दिष्ट व सूचनांची माहिती संबधित सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांना देण्यात आली आहे तसेच, Section 128 आणि 129 of MV Act 1988 कायदयाची प्रभावीपणे व कडक अंमलबजावणी करण्यात यावी.तसेच, वाहतूक केसेस करीता वापरण्यात येणाऱ्या ई चालान मशिन मध्ये १) विना हेल्मेट दुचाकीस्वार २) विना हेल्मेट पिलीयन रायडर हया दोन्ही केसेसची कारवाई Section 129/194 (D) MVA या एकाच हेडखाली आल्याने विना हेल्मेट रायडर व विना हेल्मेट पिलीयन रायडर यांची वेगवेगळी माहिती मिळत नव्हती.तरी, ई चालान मशिन मध्ये Section 129/194 (D) MVA शिर्षका मध्ये बदल करण्यात येत असून यापुढील कारवाई ही अशा दोन वेगवेगळे कडक व प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात यावी. जेणेकरून, दुचाकीस्वार चालक व पिलीयन रायडर यांचे अपघात, मृत्यूमुखी व जखमींची संख्या निश्चितच आळा बसेल परंतु पालक व वाहन धारक यांनी वाहन देताना हेल्मेट वापरणे सक्तीचे गरजेचे असताना ते दुर्लक्ष करत असल्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे ना करता येत नाही पोलीस विभागाकडून अशा कार्यवाहीला हरताळ नो फास्ट जनजागृतीच्या उद्देशाने कार्यवाही करणे अपेक्षित आहे
Comments
Post a Comment