Skip to main content
आमदार फुंडकर यांचे बॅनर फाडले,शिंदेसेनेचे नवले यांनी केली तक्रार गुन्हा दाखल*- खामगाव (दिव्यांग शक्ती)खामगांव विधानसभा मतदार संघातून भाजपाचे तरुण, तडफदार आकाशदादा फुंडकर यांनी सलग तिसऱ्यांदा विजयी होवून हेट्रिक साधली त्यामुळे कार्यकत्यांमध्ये उत्साह निर्माण झाला व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जल्लोष करून आपआपल्या भागात आकाशदादा फुंडकर यांचे अभिनंदन करून शुभेच्छा देणारे बॅनर लावण्यात आले आहेत. तर अमडापूर नाका भागातही बॅनर लावण्यात आले होते. शिवसेना (शिंदे) पक्षाचे पदाधिकारी सुनिल राजेंद्र नवले (रा. अमडापूर नाका) हे काल २८ नोव्हेंबर २४ रोजी सकाळी ६ बाजताच्या सुमारास मॉर्निंगवाक ला जात असताना त्यांना आकाशदादा फुंडकर यांच्या अभिनंदनाचे बॅनर फाडलेले दिसून आले. त्यामुळे त्यांनीच परिसरातील सिसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. त्यामध्ये मंगेश भिका भगतपुरे, निखील राजेश सपकाळ, विशाल अनिल मिटकरी व इतर दोन अनोळखी इसम यांनी बॅनर फाडल्याचे दिसून आले. या प्रकरणी सुनिल राजेंद्र नवले यांनी शिवाजी नगर पोस्टेला फिर्याद दिली. फिर्यादीवरून पोस्टेमध्ये उपरोक्त ५ जणांविरुध्द कलम ९८९ (२), ३२४ (४)/(५), १९२, सहकलम १३५ (१) मपोका नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास नापोकों भगवान साखरे करीत आहे.
Comments
Post a Comment