बिबट्या ही अफवाच!खामगांव तायडे कॉलनी सह परिसरात २७ नोव्हेंबरच्या रात्री १० च्या सुमारास
बिबट्या दिसून आल्याचा फोन येथील वन विभागाला आला. या फोन मुळे वन विभागाच्या कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ माजली. विबट्या कुठे असेल, त्याला कसे जेरबंद करावे असे आव्हानात्मक प्रश्न त्यांच्या समोर उभे ठाकले होते. सर्च ऑपरेशन दरम्यान कुठेही बिबट्या दिसून न आल्याने बिबट्यादिसल्याची वार्ता आजच्या घडीला तरी अफवाच ठरली आहे.वन विभागातील वनरक्षक बी.एस. डाबेराव, चालक मिलींद इंगळे, वनमजूरआले. रात्री ११ वाजता पासून त्या-त्या भागातील लोकांना सोबत घेवून कोल्हटकर स्मारक मंदिरामागील परीसर, तायडे कॉलनी, शिक्षक कॉलनी, जिया कॉलनी, ताजनगर, आदर्शनगर, फादर बंगला आदी परिसरात विबटवाची पहाटे ५ वाजेपर्यंत सर्च ऑपरेशन राबविले. पण या सर्च ऑपरेशन दरम्यान विबट्या तर सोडाच त्या विवटचाच्या पाऊलांच्या खुणा सुध्दा दिसून आल्या नसल्याची माहिती वनरक्षक डावेराव यांनी दिली. बिबट्या आढळल्याची वार्ता शहरात व सोशल मिडीयावरुन व्हायरल झाल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसून येते. बिबट्याच्या या वार्तेने शहरातील अनेक भागातील लोकांनी रात्र जागूनकाढली, या आधी २०२१ साली शहरात वाघ आढळून आला होता. त्यामुळे शहरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते. वन विभागाने रात्रीच्या वेळेस नागरिकांनी बाहेर पडू नये असे आवाहन केले होते.तर या विषयी वनविभागाने मागील दोन दिवस रात्र गस्त केली.कोठेही बिबटचे पायाचे ठसे दिसून आले नाही स्थानिकांना विचारले असता त्यांनीही निश्चित काही सांगितले नाही. अशी प्रतिक्रिया वन अधिकारी चेतन राठोड यांनी दिली
Comments
Post a Comment