*शहरातील सर्वात भव्य विज्ञान प्रदर्शन युगधर्म पब्लिक स्कूलमध्ये – विज्ञान, सृजनशीलता आणि तंत्रज्ञानाचा संगम! *
खामगाव: युगधर्म पब्लिक स्कूलतर्फे विज्ञानाच्या नवकल्पनांना आणि विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या शहरातील सर्वात मोठ्या विज्ञान प्रदर्शनाला भेट देण्याची संधी चुकवू नका! हे प्रदर्शन *३० नोव्हेंबर २०२४ ते १ डिसेंबर २०२४* दरम्यान, *सकाळी १० ते सायंकाळी ५* वाजेपर्यंत भरविण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी *सुप्रसिद्ध उद्योजक श्री. संतोषजी देशमुख* तर उद्घाटक म्हणून *खामगाव बी.एड. कॉलेजचे प्राचार्य श्री. गजाननजी शर्मा,* *सूर्योदय एज्युकेशन सोसायटी चे अध्यक्ष श्री गोपालजी अग्रवाल* उपस्थित राहणार आहेत. या प्रदर्शनाचे विशेष आकर्षण म्हणजे विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेली अनोखी वैज्ञानिक मॉडेल्स. केवळ शाळेपुरती मर्यादित न ठेवता ही प्रदर्शनी सर्व पालकांसाठी खुली करण्यात आली आहे, ज्यामुळे विज्ञानप्रेमींच्या कल्पकतेला नवी दिशा मिळेल. पालकांसाठी आयोजित क्विझ आणि विविध मनोरंजक स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे, ज्यामध्ये विजेत्यांसाठी आकर्षक बक्षिसे आहेत.विद्यार्थ्यांसाठी *पर्यावरणपूरक विज्ञान उपक्रम,* ज्यात पुष्पगुच्छ तयार करून सृजनशीलता व तंत्रज्ञानाला पर्यावरणाशी जोडण्याचा प्रयत्न आहे. शहरातील विज्ञानप्रेमी नागरिक, पालक, आणि विद्यार्थ्यांसाठी हे प्रदर्शन म्हणजे विज्ञानाचा साजरा करण्याचा एक अनोखा उत्सव आहे. तर मग, *विज्ञानाची नवी दालने उघडण्यासाठी, विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला पंख देण्यासाठी आणि विज्ञान, तंत्रज्ञान, व पर्यावरणाचा नवा अध्याय अनुभवण्यासाठी* विज्ञान प्रदर्शनीला नक्की भेट द्या!तुमची उपस्थिती *उद्याच्या वैज्ञानिकांना नवसंजीवनी देईल!* असे आव्हान शाळेचं प्राचार्य श्री यशवंतजी बोदडे सर यांनी केले
Comments
Post a Comment