रस्त्यात रेती टाकून रेती े चां टीप्पर पळाला. शेगांव
(दिव्यांग शक्ती प्रतिनिधी) शेगांव तालुक्यातील भास्तन व कठोरा येथील पूर्णा नदीच्या पात्रातुन रेतीचा अवैद्य उपसा दिवस-रात्र सव्वाशे ते दीडशे गाडीचा या शिवारातून सुरू आहे या रेती उपसा ला शासनाची घाट हराशी झालीच नसल्याने जळगाव जामोद नांदुरा शेगांव खामगांव या तालुक्यांमध्ये या घाटावरून रेतीची खुलेआम विक्री होत आहे तर यासंबंधी कुठल्याच घाटाची हराशी न झाल्यामुळे या अवैद्य रेती व्यवसायिकांची अधिकाऱ्यांना हाताशी धरून ते दिवाळी दिवस रात्र साजरी करीत असल्याचे पहावयास मिळत आहे या वाहनांना मर्यादेला वेग नसणाऱ्या त्यांच्या सुसाट टिप्पर सदृश्य इतर वाहन विना नंबर प्लेट चे सुसाट वेगाने धावत आहेत या रेती व्यावसायिक व त्यांच्या वर अंकुश ठेवण्याचा शासकिय यंत्रणेचा कुठल्याच प्रकारचा धाक त्यांच्यामध्ये नसल्याने चिरीमरीचा ससेलोटा पाहता यांच फावत असल्याचं आहे आज पहुरजीरा ते माक्ता या रस्त्यावर महसूल विभागाचे कर्मचारी व पत्रकारांचा एक ग्रुप या रस्त्याने येत असताना त्यांना पाहता एका टिप्परधारकांनी रस्त्यावरच रेती खाली करून धूम ठोकली तर या रस्त्यावर पडलेल्या रेती मुळे दुचाकी वाहन यांचा अपघात होण्याचीही शक्यता आहे आरटीओ विभागाने दिलेल्या नंबरला हरताळ फासत जबाबदार अश्या विना नंबर प्लेटच्या गाड्यांवर कार्यवाही करण्याकरिता जबाबदार राहणारा विभाग काय करत आहे दिवसा ढवळ्या वाहतूक वर लक्ष देणारा विभाग काय करतो आहे सुसाट पळणाऱ्या वाहनावर कोणता विभाग कार्यवाही करणारी यंत्रणा का सुस्थ ठेवत आहे हे एक न उकळणारे कोड आहे असे दिसत आहे.
Comments
Post a Comment