मतमोजणीसाठी रस्त्याची सूचना शहर पोलिसांच्या वतीने
रस्त्याबाबत सूचना पो. स्टे. खामगांव शहर यांच्या वतीने
खामगांव - खामगाव शहरातील
सर्व नागरीकांना सूचित करण्यात येत आहे की, दिनांक 23.11.2024 रोजी जे.व्ही. मेहता न्यूईरा हायस्कुल खामगांव येथे विधानसभा निवडणूक 2024 चे संबंधाने मतमोजणी होणार असून मतमोजणीचे निकाल ऐकण्यासाठी खामगांव शहरातील व विधानसभा क्षेत्रातील लोक फार मोठ्या प्रमाणावर जमणार आहेत. मतमोजणीचे ठिकाणी जाण्यासाठी एकच मार्ग असल्याने नागरीकांची गैरसोय होऊ नये म्हणून मतमोजणीचे दिवशी दिनांक 23.11.2024 चे सकाळी 07.00 ते 17.00 वा. पावेतो मतमोजणी ठिकाणाकडे जाणारा मार्ग माता रमाई चौक येथून मा. जिल्हादंडाधिकारी बुलढाणा यांचा आदेश क्र. कावि/गृहविभाग/कक्ष- 4(3)/858/2024 दिनांक 19.11.2024 अन्वये बंद करण्यात आला असुन त्यामध्ये पुढीलप्रमाणे बदल करण्यात आला आहे.
पर्यायी मार्ग पुढीलप्रमाणे बस स्टैंड, शर्मा टनींग, सा. रु. खामगांव, बोबडे कॉलनी, कावेरी दाताचा दवाखाना, भैरवनाथ मंदीर, शिवकल्याण चौक डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, गजानन कॉलनी, जगदंवा दळण केंद्र, पाण्याची टाकी, वामन नगर चौक
तरी समता कॉलनी, गजानन कॉलनी, शंकर नगर, जिया कॉलनी, हरीफैल, वामन नगर, तायडे कॉलनी, समन्वय नगर, शिक्षक कॉलनी, पंढरीबाबा मंदीर या भागातील नागरीकांनी दि. 23.11.2024 रोजी सकाळी 07.00 ते 17.00 वा. पर्यंत जाण्यायेण्या करीता वरील पर्यायी मार्गाचा उपयोग करावा असे
Comments
Post a Comment