गरजू रुग्णांना मदतीचा हात देणारे श्री गुरुदेव आपत्ती व्यवस्थापन मंडळखामगाव (प्रतिनिधी)-
गरीब व गरजू रुग्णांना गत पाच वर्षापासून मदतीचा हात माटरगाव येथील श्री गुरुदेव आपत्ती व्यवस्थापन मंडळातर्पेâ देण्यात येत आहे. आपत्ती व्यवस्थापन मंडळातील नागरिकांचे हे कार्य खरोखरच कौतुकास्पद आहे. त्यांचा हा आदर्श डोळ्यासमोर ठेवून प्रत्येक गावात अशा प्रकारचे मंडळ स्थापन झाले तर गरिब व गरजू रुग्णांना पैशाअभावी औषधापासून वंचित औषधाला लागणार्या पैशासाठी कोणासमोर हात पैâलावे लागणार नाही.आचार्य हरीभाऊ वेरुळकर गुरुजी यांच्या प्रेरणेने माटरगाव येथील काही लोकांनी एकत्र येवून २०१९ साली श्री गुरुदेव आपत्ती व्यवस्थापन मंडळाची स्थापना केली. या मंडळातील सदस्यांची संख्या आजच्या घडीला केवळ १४ आहे. २४ नोव्हेंबर रोजी जलंब पोस्टेचे ठाणेदार अमोल सांगळे यांनी या मंडळाचे सदस्यत्व स्विकारले आहे. विशेष उल्लेखनीय म्हणजे या मंडळातील सदस्य हे दरमहा प्रत्येकी ५०० रुपये स्वखुशीने देतात आणि जमा झालेल्या या रक्कमेतून गोरगरीब रुग्णांना औषधासाठी पैसे देण्यात येतात. आतापर्यंत या मंडळातर्पेâ ६०० ते ७०० रुग्णांना औषधासाठी आर्थिक मदत देण्यात आली आहे. एवढ्यावरच मंडळाचे हे कार्य थांबले नाही तर मंडळातर्पेâ गरजू विद्यार्थ्यांना दरवर्षी अभ्यासासाठी लागणारी शालेय कीट, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार असे विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. याचबरोबर व्यसनमुक्त झालेल्या व्यक्तींचा या मंडळातर्पेâ सत्कार करण्यात आला. या मंडळात नव्यानेच सहभागी झालेले ठाणेदार अमोल सांगळे यांचा मंडळाचे अनंतराव आळशी, विश्वनाथ गायकी, देविदास जवरे आदींच्या हस्ते सत्कार करण्यात आला. मंडळाने चालविलेले हे उपक्रम यशस्वी करण्यासाठी अनंतराव आळशी, विश्वनाथ गायकी, रामभाऊ दळवी, देविदास जवरे, डॉ. डॉ.प्रमोद शुक्ला, गोपाळ मिरगे, राजेश भुतडा, जुगलकिशोर गांधी, गजानन निखाडे, अशोक मोरे, राम देशमुख, प्रदीप मुंढे, गोपाल राठी आदी परीश्रम घेत आहेत.
Comments
Post a Comment