Skip to main content
*दादांची हॅट्रिक* *शेतकरी व लाडक्या बहिणींचा आशीर्वाद मतदान स्वरूपात* खामगाव (व्यंगशक्ती प्रतिनिधी) मतदार संघामध्ये विपरित परिस्थिती दिसत असतांना व विरोधी पक्षाच्याकडे लक्ष न देता आ. आकाशदादा फुंडकर, सागरदादा फुंडकर, फुंडकर परिवार, भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी आकाशदादा फुंडकर यांची हॅट्ट्रीक व्हावी यासाठी दिवसरात्र एक केले होते. सोशल मिडीयावरसुध्दा भाजपा सोशल मिडीया सेलच्या वतीने जोरदार प्रचार सुरू होता. तर काँग्रेसच्या उमेदवारांकडून प्रचारादरम्यान काही चुका झाल्या होत्या त्याचा भरघोस फायदा भाजपाला मिळाला. मतदानाच्या एक-दोन दिवसापूर्वी मतदारसंघाचे चित्र बदलत होते व आकाशदादा फुंडकर यांना मोठी आघाडी मिळेल अशी हवा होत होती. आ.आकाशदादा फुंडकर यांची विजयाची हॅट्रिक करीत एक लाख दहा हजार 599 मते त्यांनी मतदान स्वरूपातघेतलेत्यांच्या विजयासाठी झटत मुस्लिम व वंचित कडे असलेला मतदार त्यांच्या कडे वळून घेत मतदान करून झुकला त्यातूनच त्यांचा विजय निश्चित झालाअगदी शांत व नियोजनपूर्वक आपला प्रचार करत भेदभाव वाद विवाद होणार नाही यासाठी कार्यकर्त्यांची टीम सक्रिय करत निवडून येण्याचा संकल्प कार्यकर्त्यांना दिला त्याचे फळ म्हणून आज या विजयावर शिक्कामोर्तब झाले यामध्ये 110599 आकाश फुंडकर दिलीपकुमार सानंदा 85122 देवराव हिवराळे 26482 मते तर 25477 मतांनी आकाशदादा फुंडकर यांचा विजय हॅट्रिक स्वरूपात झाला
Comments
Post a Comment