जय भीम च्या गजरात भीमजयंतीनिमित्त खामगांव शहरातुन निघ्ााली भव्य मिरवणुक मिरवणुकीमध्ये सहभागी झालेल्या मंडळाचे अध्यक्ष पदाधिकाऱ्यांचा सानंदांनी केला सत्कार
खामगाव ः-खामगाव शहरात 14 एप्रिल 2024 रोजी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा उत्साह ओसंडून वाहत होता. भीम जयंतीनिमित्त ठिकठिकाणी विविध कार्यक्रम पार पडले. येथील नगर परिषद मैदानावरील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसराला जयंतीनिमित्त यात्रेचे स्वरूप आले होते. महामानवाला अभिवादन करायला विविध सामाजिक संघ्ाटनासह, हजारो अनुयायींनी गर्दी केली होती.दुपारी 3.30 वाजतापासून शहरात भव्य मिरवणुकीला प्रारंभ झाला. या मिरवणुकीत सम्राट अशोक मंडळ बाळापुर फैल, भीमशक्ती मंडळ बाळापुर फैल, पंचशील क्रीडा मंडळ बाळापुर फैल, सम्राट क्रीडा मंडळ हरी फैल, समता क्रीडा मंडळ शंकर नगर, तथागत मंडळ हिरानगर,अशोका क्रीडा मंडळ दालफैल व जुना फैल भागातील सिध्दार्थ क्रिडा मंडळाचा समावेश होता. मिरवणूकीमध्ये जयभीमच्या गजरात डीजेच्या तालावर तरुणाईसह हजारो महिला, पुरुष व बालगोपाल, अबालवृद्ध मिरवणुकीत सहभागी झाले होते.
मिरवणुकीत भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे आकर्षक तैलचित्र सर्वांचे लक्ष वेधून घ्ोत होते.मिरवणुकीने संपूर्ण शहर दणाणून गेले. संपूर्ण शहरात भीम जयंतीचा माहोल पहावयास मिळाला.निळे झेंडे ,पताका ,बॅनर ने संपूर्ण खामगाव शहर सजले होते.
भीम जयंती निमित्त राणा फाउंडेशनच्या वतीने माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी नगर परिषद मैदानावरील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन केले व उपस्थितांना भीम जयंतीच्या शुभेच्छा देऊन भीम जयंती निमित्त लाडू वाटप केले. तद्नंतर माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी भीम जयंती निमित्त निघ्ाालेल्या विविध मंडळांना भेटी देऊन मंडळाचे अध्यक्ष व प्रमुख कार्यकर्त्यांचा पंचशील दुपट्टा घ्ाालून सत्कार केला व पेढा भरवुन त्यांचे तोंड गोड केले. यावेळी त्यांच्या समवेत माजी नगराध्यक्षा श्रीमती सरस्वतीताई खासणे,खामगाव तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मनोज वानखडे,खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मंगेश इंगळे,संचालक राजेश हेलोडे,
माजी नगरसेवक किशोरआप्पा भोसले,नारायण गायकवाड,प्रितम माळवंदे,जीवन जाधव,सागर मुयांडे पाटील ,सागर केवारे आदींची उपस्थिती होती.
विविध मंडळांच्या उत्साही कार्यकर्त्यानी माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांना खांद्यावर उचलून घ्ोत डी.जे.च्या गाण्यांवर ताल धरत भीमजयंतीचा जल्लोष साजरा केला.भीम जयंतीनिमित्त निघालेल्या मिरवणूकीत सहभागी झालेल्या नागरिकांसाठी विविध सेवाभावी संस्था व मंडळांच्या वतीने नागरीकांना थंड पाणी,शरबत,मठठ्ा,पोहे व भोजन वितरीत करण्यात आले. या मंडळांना सुध्दा माजी आमदार राणा दिलीपकुमावर सानंदा यांनी भेट देवुन विधायक उपक्रम राबविल्याबदद्ल मंडळाच्या पदाधिकारी व सदस्यांचा पंचशील दुपटट्ा देवुन व पेढा भरवुन सत्कार केला.


Comments
Post a Comment